आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्यावर प्रेम केलं, करवा चौथचं व्रतही केलं, 8 वर्षांनंतर त्यानेच दिला धोका; वाचा, राधिकाची कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- ती मागील आठ वर्षांंपासून त्याच्यासाठी करवा चौथचे व्रत करत आहे. एवढेच नाही, तर एका पत्नीप्रमाणे त्याच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याला साथ देत आहे. आज तिला त्याच्याकडून एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे, त्याने तिचा स्वीकार करावा. तिच्यासोबत लग्न करावं. पण, झाले ते भलतेच. त्याने तिला तब्बल आठ वर्षानंतर धोका दिला आहे. तिच्यासोबत लग्न करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला आहे. त्याचे दुसर्‍या मुलीसोबत लग्न ठरले आहे. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील मेरठमधील राधिकाची. (नाव बदलले आहे) राधिका सध्या लखनऊमध्ये असून तिने प्रियकराविरोधात महिला आयोगाकडे‍ तक्रार नोंदवली आहे.

राधिकाचा होकार मिळवण्यासाठी त्याने कापला होता हात...
- राधिकाने सांगितले की, ती नववीत होती. तेव्हा तिच्या शेजारी राहाणारा कुलदीप सिंह तिच्याकडे सारखा पाहायचा. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते.
-कुलदीपने तिला प्रपोजही केले होते. पण, राधिकाने त्याला स्पष्‍ट नकार दिला होता.
- राधिकाने नकार ऐकल्यानंतर कुलदीपने स्वत:च्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर हात जाळण्याचा देखील प्रयत्न केला होता.
- हा प्रकार जवळपास वर्षभर सुरुच होता.
- अखेर राधिकाने कुलदीपचे प्रेेम स्विकारले. त्याला तिने होकार दिला. तिचाही जीव त्याच्यावर जडला.

गेल्या आठ वर्षांपासून कुलदीपसाठी करते आहे करवा चौथचे व्रत
- राधिका उच्च शिक्षणासाठी 2007 मध्ये पंजाबला गेली. कुलदीप देखील तिला भेटण्यासाठी अधूनमधून पंजाबला जात होता.
- दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले होते की, राधिकाने कुलदीपला मनोमनी पती मानले होते. त्याच्यासाठी ती करवा चौथचे व्रतही करत होती.
- कुलदीप देखील तिच्यासोबत पतीसारखा व्यवहार करत होता. तिच्यासोबत सर्व सुख-दु:ख शेअर करत होता.
- अनेकदा तर दोघे एकमेकांसोबत राहिले होते. कुलदीप सध्या पोलिस विभागात कार्यरत आहे.

राधिकाच्या वडिलांकडे मागितले 20 लाख रोख आणि 20 लाख हुंडा...
- कुलदीपचा हापुड येथील राहाणार्‍या एका मुलीसोबत (प्रियांका) विवाह ठरल्याचे राधिकाला काही दिवसांपूर्वी समजले. हेे ऐकूण तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कुलदीप आणि प्रियांकाचा 21 फेब्रुवारी 2016 रोजी साखरपुडा झाला.

विवाहासाठी मागितले 20 लाख रोख आणि 20 लाख हुंडा...
- कुलदीपचा हापुड येथील राहाणार्‍या प्रियांकासोबत लग्न ठरल्याचे राधिकाला धक्का बसला. कुलदीप आणि प्रियांकाचा 21 फेब्रुवारी 2016 रोजी साखरपुडा झाला.
- हे ऐकूण तर राधिकावर दु:खाचा डोंगर कोसळला.
- कुलदीपसोबत राधिकाने चर्चा केली. कुलदीपने राधिकासोबत विवाह करण्यास होकार दिला. पण एक अट ठेवली. ती म्हणजे राधिकाच्या वडिलांकडे त्याने 20 लाख रोख आणि 20 लाख रुपये हुंड्याची मागणी केली‍. राधिकाच्या वडीलाने हुंडा देण्यास सपशेल नकार दिला.
- मेरठ पोलिस ठाण्यात वारंवार जाऊनही राधिकाला न्याय मिळाला नाही. आता राधिका महिला आयोगाकडे धाव घेतली इन्स्पेक्टर सत्या सिंह यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
-याप्रकरणाची चौकशी सुरु केली असून राधिकाला लवकरात लवकर न्याय मिळेल, असे सत्‍या सिंह यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, राधिका आणि कुलदीपचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...