आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashinath Singh Returned Sahitya Akademi Award Against Communal Violence

दादरी कांड: काशीनाथ सिंह यांनीही परत केला साहित्य अकादमी पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो: काशीनाथ सिंह.
वाराणसी - दादरी कांडसारख्‍या जमातवादीय घटनांच्याविरुध्‍द साहित्यिकांच्या विरोधाचे लोण पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीपर्यंत पोहोचले आहे. 'काशी का अस्सी' चे प्रसिध्‍द लेखक काशीनाथ सिंह यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करण्‍याची घोषणा केली आहे. प्रसिध्‍द कन्नड लेखक कुलबर्गी, डॉ. दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या, दादरी कांड आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांच्या निषेधार्थ पुरस्कार परत करीत असल्याचे सिंह यांनी सांगितले.
साहित्य अकादमीत भाजपला आपला माणूस हवायं
भाजप सरकारला साहित्य अकादमीचे स्वातंत्र नष्‍ट करुन तेथे आपले लोक बसवायचे आहेत, असे काशीनाथ सिंह यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी साहित्य अकादमीची बैठक आहे. त्यात काय घडते याची मला उत्सुकता आहे, असे ते म्हणाले.
काशीनाथ यांचे साहित्य
-काशी का अस्सी, अपना मोर्चा, सदी का सबसे बडा आदमी, घर का जोगी जोगडा आणि रेहन पर रग्घू.