आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये ईडीआय गेस्ट हाऊसमधून लाखोंची चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील ईडीआय इमारत पुन्हा वादात अडकली आहे. इमारतीच्या गेस्ट हाऊसमधून १४ एलईडी, दोन संगणक, गादी, ब्लँकेट चाेरी झाले आहे. संस्थेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच संस्थेतील मुख्य इमारतीमध्ये अतिरेक्यांनी लपून गोळीबार केला होता.
अवंतीपोरा ठाण्यातील पोलिसांनुसार, संस्थेने तक्रार दिली आहे. यामध्ये चकमकीदरम्यान इमारतीतून चोरी झाल्याचे म्हटले आहे. चकमकीनंतर चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिस याचा गांभीर्याने तपास करत आहेत. इमारतीला तीन दिवस वेढा देण्यात आला होता, त्यामुळे सामग्री चकमकीआधी गायब झाली की त्यानंतर याचा शोध घेतला जात आहे. अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने इमारत उडवून देण्याची योजना आखली होती. मात्र, त्यानंतर प्रस्ताव लांबणीवर पडला.
चकमक तीन दिवस चालली : १० ऑक्टोबर रोजी २ अतिरेक्यंानी ईडीआय इमारतीवर हल्ला केला. चकमक तीन दिवस चालली. त्यात दोन अतिरेकी ठार झाले होते. या इमारतीवर दुसऱ्यांदा हल्ला झाला.

बुऱ्हाणच्या मृत्यूनंतर नवी संघटना
बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील अनेक तरुण बेपत्ता झाले. त्यांनी अल उमर मुजाहिदीन संघटना स्थापन केली. त्यांच्याकडे लष्कर आणि पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे आहेत. संघटनेचा मुख्य कमांडर मुश्ताक जरगर जकुराने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जकुरामध्ये शुक्रवारी हल्ला झाला. त्यात एक जवान शहीद, तर आठ जखमी झाले.

दोन तरुणांकडून एसपीओची हत्या
जम्मू - कठुआ जिल्ह्याच्या बिलावर भागात दोन मित्रांनी आपल्याच भागातील एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली. दोघांनी एसपीओ हेमंत बसोत्रा यांना बोलावून नेऊन दगडाने ठेचले. पोलिसांनी नरेशकुमारला पकडले असून दुसरा फरार आहे. एसपीओ हेमंत यांनी मनवीरला थोबाडीत मारले होते. त्याचा दोघा मित्रांनी सूड घेतला.
बातम्या आणखी आहेत...