आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmir Floods News In Marathi, Divya Marathi, Earthquak

काश्मीरमधील पूरसंकटानंतरआता भूकंपाचा धोका, दोन दिवस बसले भूंकपाचे हादरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरमधील पूरसंकटानंतर आता राज्यात भूकंपाचा धोका वाढला आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत भूकंपाचे अनेक हादरे बसले. बुधवारी रात्री डोडा तसेच भद्रवाह भागात भूकंपाचे तीन धक्के जाणवले. रात्री १०.३० वाजता पहिला, १०.४० वाजता दुसरा, तर गुरुवारी सायंकाळी ५.४८ वाजता तिसरा धक्का बसला.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ आिण ३.७ एवढी होती. धक्क्यांमुळे लोक घराबाहेर सैरावैरा पळू लागले. अनेकांनी रात्र बाहेरच काढली. दुसरीकडे, श्रीनगरचा महामार्ग सुरू झाल्यामुळे दररोज शेकडो ट्रक येथे पाेहोचत आहेत. ट्रकमधून धान्य व इंधनपुरवठा केला जात आहे. लोकांच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी या वस्तूंचा पुरवठा गरजेचा होता. सरकारचा धान्यसाठा पुरात खराब झाला आहे. दरम्यान बीसएसनएलने खोऱ्यातील लोकांसाठी पाच हजार सिमकार्ड िवतरित केले आहेत. लोकांकडे रहिवासी पुरावे उपलब्ध नसल्याने त्याशिवाय हे सीम वाटप केले जाणार आहेत.

दहावी,बारावीची परीक्षा स्थगित : जम्मू व काश्मीर शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित केरण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.

सचिवालयातही कामकाज
जम्मू-काश्मीर सचिवालयातील कामकाज ११ दिवसांनंतर सुरू झाले. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या तुरळक होती. साधारण १०० कर्मचारी कार्यालयात होते. सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश बजावले होते. सचिवालयाच्या तळमजल्यामध्ये पाणी साचले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारपासून सचिवालयाच्या जुन्या इमारतीत कामकाज होणार आहे.