आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर भारतासाठी सर्वांत अवघड आव्हान, मुख्यमंत्री सईद यांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करणे व सामान्य जनजीवन सुरळित करणे हे भारतापुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी म्हटले आहे. लहानमोठ्या विरोधांना भीक न घालता आपण लोकशाहीला मजबूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सईद रविवारी विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीनंतर सभागृहाला संबोधित करत होते.

सईद म्हणाले, लहानमोठ्या विरोधास न घाबरता लोकशाही मजबूतीचे शिखर सर केल्याशिवाय राहणार नाही. सरकार चालवणे हाच आमचा उद्देश नाही, भाजपलाही ते ठाउक आहे. येथील आव्हानांची त्यांनाही कल्पना आहे. सर्वांना सोबत घेऊन चालल्यामुळे अनेकदा स्वत:च्याच पक्षातील लोकांची नाराजी ओढवून घेतल्याचे सईद यांनी या वेळी मान्य केले. राज्यातील नागरिकांनी लोकशाही व राजकीय संस्थांना मजबूत करण्यासाठी दिलदारपणे आमच्या पदरात मतांचे दान टाकले आहे. जनतेने लोकशाहीला ही विश्वासहर्ता प्रदान केली आहे ती आपण फोल जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करू, असेही ते या वेळी म्हणाले.

काँग्रेसकडून टीका
श्रीनगर | भाजप-पीडीपीचे सरकार काश्मिरी पंडितांच्या प्रकरणाचे राजकारण करून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी.ए. मीर यांनी केली. ते म्हणाले, विस्थापितांनी राज्यात परतावे असे या पक्षांना खरेच वाटत असेल तर त्यांनी राजकारण बंद केले पाहिजे.