आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: काश्‍मिरमध्‍ये छर्रेवाल्‍या बंदुकीचा वापर, डोळ्यात छर्रे गेल्‍याने कित्‍येक अंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचा मृत्यू झाल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेला हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. आतापर्यंत 400 हून अधिक वेळा सुरक्षादल आणि आंदालकांमध्‍ये चकमक झाली आहे. सुरक्षा दलाकडून आंदोलकांना हुसकावून लावण्‍यासाठी तितर-बटेरच्‍या शिकारीसाठी वापरत असलेल्‍या छर्रे असलेल्‍या बंदुकीचा वापर केला जात आहे. या बंदुकीमुळे कित्‍येक आंदोलक जखमी झाले आहेत. काहींच्‍या डोळ्याला दुखापत झाली आहे. काही जण कायमचे अंध झाले आहेत. आतापर्यंत 92 जखमी लोकांचे ऑपरेशन करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली आहे...

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीनगरच्‍या महाराजा हरि सिंह हॉस्पिटलमध्‍ये आतापर्यंत या बंदुकीने जखमी झालेल्‍या 92 लोकांवर उपचार करण्‍यात आले आहेत.
- याशिवाय या बंदुकीमुळे जखमी झालेल्‍या आंदोलकांची संख्‍या दर तासाला वाढत आहे.
- डॉक्टर्सच्‍या माहितीनुसार काहींच्‍या जखमा या अत्‍यंत गंभीर आहेत. काही जण कायमचे अंध होऊ शकतात.
- आतापर्यंत हिंसाचारात 32 जण ठार झाले आहेत. तर, 1400 जखमी आहेत.
काय आहे पॅलेट गन, कशी करते काम..
- काश्मीरमध्‍ये हिंसाचार रोखण्‍यासाठी 2010 पासून पोलिस या बंदुकीचा वापर करत आहेत.
- या हत्‍यारामुळे लोक ठार होऊ नये यासाठी पोलिसांनी त्‍याचा वापर सुरू केला.
- या बंदूकीतून शेकडो छर्रे निघतात त्‍यामुळे शरीरात अशा जखमा होतात.
- बंदुकीचा छर्रा डोळ्यात गेल्‍यास कायमचे अंधत्‍व येऊ शकते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, या जखमा कसे सोसत असतील आंदोलक..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...