आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Terrorist Encounter Search And Cordon Operation Security Forces News And Updates

‘भारत माता की जय’च्या घोषणा देत शहिद सुमेधला निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/अकोला- जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत  जवान सुमेध वामनराव गवई हे १२ ऑगस्टला शहीद झाले. सोमवारी दुपारी २ वाजता बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन लोणाग्रा या गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. जवान सुमेध यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी जवानांनी जेव्हा खांद्यावर घेतले तेव्हा ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे देत युवकांनी संताप व्यक्त केला.

अग्नी देताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी ५ वाजता शोपियां जिल्ह्यातील पुलवामा या गावात अल कायदाचे दहशतवादी लपले होते. त्यासाठी महार बटालियनच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. अल कायदाचा सरगना जाकीर मुसा याचा शोध जवान बुलेटप्रूफ वाहनातून घेत होते, तर तेथील स्थानिक नागरिक अल कायद्याच्या दहशतवाद्यांना संरक्षण देत भारतीय जवानांवर दगडफेक करत होते. अशातच दहशतवाद्याच्या चकमकीत जवान सुमेधच्या छातीतून गोळी आरपार गेली. त्यात ते शहीद झाले. शहीद सुमेध यांचे पार्थिव सोमवारी रात्री लष्कराच्या विशेष विमानाने नागपूरला पोहोचले. सोमवारी १२ वाजता ते लोणाग्रा येथे पोहोचले. सर्वप्रथम त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. पार्थिव पाहताच वडील वामनराव, आई मायाताई व दोन महिन्यापूर्वी लष्करात दाखल झालेला भाऊ शुभम व बहिणीने हंबरडा फोडला.   

मुलाचे तोंड पाहू द्या  
मला माझ्या मुलाचे तोंड पाहू द्या, असे आईने म्हणताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सुमेधचा अखेरचा चेहरा पाहण्यासाठी नातेवाइकांसह त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळातच त्याचे पार्थिव जवानांनी खांद्यावर घेतले तेव्हा संतप्त युवकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे देत ‘शहीद सुमेध गवई अमर रहे’च्या घोषणा दिल्या.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...