आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये बुरहान-सब्जारनंतर दहशतवादी मट्टूला कंठस्नान, एक जवानही शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजबेहरा येथील मलिक भागाला लष्कराने वेढा घातला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
बिजबेहरा येथील मलिक भागाला लष्कराने वेढा घातला आहे. (संग्रहित फोटो)
श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा येथे लष्कर आणि लष्कर-ए-तोयबा दरम्यान चकचक सुरु आहे. तीन दहशतवादी एका घरात लपले आहेत. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लष्कराचा बख्तावर सिंह हा जवान शहीद झाला आहे. गुरुवारी दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या हल्ल्यात दोन पोलिस जवान शहीद झाले होते. 

नागरिकांनी केली दगडफेक

- लष्कराने शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास अरवानी गावातील मलिक या भागात एका घराला वेढा घातला. या घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.  सकाळी 10 च्या या ठिकाणी गोळीबार सुरु झाला.
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नागरिकांनी यावेळी लष्करावर दगडफेक केली. त्यामुळे पॅलेट वापरावी लागली. या घटनेत एका 22 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. 6 नागरिकही यावेळी जखमी झाले. 
- लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये मट्टु नावाच्या एका दहशतवाद्याचाही समावेश होता. मट्टूने अनंतनागमध्ये 2016 मध्ये दोन पोलिसांना गोळ्या घातल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...