आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदमुळे काश्मिरात ७२ तासांसाठी इंटरनेटसह मोबाइल सेवा बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक व तणावपूर्ण असल्याने जम्मू काश्मीर सरकारने सतर्कतेचा उपाय म्हणून सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सेवेसह मोबाईल सेवेवरही ७२ तासांसाठी बंदी घातली. मात्र, यात फक्त राज्यव्यापी सरकारी बीएसएनएल मोबाईल सेवा सुरु राहील.

राज्यातील १० जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची तणावपूर्ण परिस्थिती व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतल्यानंतर संपूर्ण इंटरनेट सेवा बंदीचा निर्णय आला. एअरटेल, एअरसेल, व्होडाफोन आणि रिलायन्स टेलेकॉम सेवा पुरवण्याऱ्यांना ही सेवा तत्काळ ७२ तासासाठी खंडीत करण्याचे वा थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. यासह सरकारी बीएसएनए सेवेलाही त्यांची ब्रॉडबॅण्ड सेवा थांबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. खरे तर मोबाईल सेवा बंदीचे आदेश हिज्बुलचा मुजाहिदीनचा कमांडर बुर्हान वनीच्या पोलींसांबरोबर झालेल्या चकमकीतील मृत्यूनंतरही लगेच दिले गेले होते. २७ जुलैला देखील अंशत: काही भागात मोबाईल बंदीचे आदेश होतेच. शिवाय गेल्या दोन महिन्यापासून प्री पेड, नव्या मोबाईलसेवा जोडण्या बंदच आहेत. दरम्यान फुटीरतावादी नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयावर मंगळवारी निदर्शने करतानाच १६ पर्यंत बंदचे आवाहन त्यांनी काश्मीरी जनतेला केले आहे. त्यामुळे तणाव आहे.
पुंछमधील चकमकीत अतिरेक्याचा मृत्यू
जम्मू | सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत आज पुंछ जिल्ह्यामध्ये आणखी एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह एका घरातून मिळाला. यामुळे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या चार पर्यंत गेली आहे, अशी माहीती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने आज दिली. तीन दहशतवादी आणि एका पोलीसाचा काल मृत्यू झाला. तर एका पोलीस अधिकाऱ्यासह एकूण सहा जण दुहेरी चकमकीत जखमी झाले. या पोलीसावर काल सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहीती राजौरी-पुंछ क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक(आयजी) जॉनी विल्यम यांनी दिली. पुंछ शहरातील बांधकाम सुरु असलेल्या मिनी सेक्रेटरीएटमध्ये गोळीबार अद्याप सुरु असून, सुरक्षा दलांची अतिरेक्यांविरुध्दची मोहीम देखील सुरच आहे.
काश्मिरात सामान्य जीवन पुन्हा विस्कळीत
श्रीनगर - सलग ६६ व्या दिवशी देखील काश्मीर खोऱ््यातील सामान्य जनजीवन आज पुन्हा विस्कळीत झाले. हिंसाचारग्रस्त काश्मीरात ईदच्या पार्श्वभूमीवर सरकारने चळवळ निदर्शने, लोकांच्या एकत्र येण्यावरही काही भागात, तसेच खोऱ्यातील शहरांच्या काही भागातील निर्बंध मात्र, उठवले आहेत. यात श्रीनगर शहरातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीचाही समावेश आहे. तसेच गंदरबाल, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, सोपोरे, कुलगाम, पुलवाडा आणि अनंतनाग शहरातील निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र स्थिती सुधारत असतांनाच फुटीरतावादी नेत्यांकडून सातत्याने खोरे बंद ठेवण्याच्या आदेशवजा आवाहनामुळे स्थिती बिघडते दुकाने यामुळे फक्त संध्याकाळीच आठवड्यातून एक दोनदाच उघडतात.
१८ ठिकाणी दगडफेक, २ सीआरपीएफ जवान जखमी
दरम्यान आता हिंसाचारात मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या ७६ वर पोहोचली असून यात २ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान सीआरपीएफ ने गेल्या २४ तासात १८ ठिकाणी झालेल्या दगडफेकीत त्यांचे ५ जवान जखमी झाले तर त्यांचे २ वाहनांचे जबर नुकसान झाले आहे, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...