आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर खो-यातील सुरक्षा घुसखोरीमुळे धोक्यात, लष्कराचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - घुसखोरी हा काश्मीर खो-यातील सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचा इशारा देऊन आव्हान पेलण्यासाठी सुरक्षा संस्था समन्वयाने काम करत असल्याचे लष्कराच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले आहे.


काश्मीर खो-यातील घुसखोरी हा मोठा धोका आहे. (पाकव्याप्त काश्मिरात) दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे आणि घुसखोरीची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी आमची प्रभावी गुप्तहेर यंत्रणा आहे. आमच्याकडे सर्व सुरक्षा संस्थांशी भक्कम समन्वय असलेली गुप्तहेर यंत्रणा असून आम्ही या आव्हानाचा सामना करू, असे लष्कराच्या 15 व्या ब्रिगेडचे जनरल ऑफिसर कमांडिंग गुरमितसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जवानांच्या जागरुकतेमुळेच कुपवाडा जिल्ह्यातील केरान भागातून काश्मिरात घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न फसल्याचे त्यांनी सांगितले. सीमेपलीकडील दहशतवादी प्रशिक्षण केंदे आणि घुसखोरी स्थळांची संख्या विचारली असता संख्या महत्त्वाची नसून प्रभावी गुप्तहेर यंत्रणेद्वारे हे आव्हान निपटून काढले जाऊ शकते. प्रशिक्षण केंद्रांची संख्या किती यात मला रस नाही, असे ते म्हणाले.