आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 व्या दिवशीही हिंसाचार; चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच धुमश्चक्रीत युवकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- अशांत काश्मीरसंबंधी सरकारी पातळीवर उच्चस्तरीय चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच मंगळवारी खोऱ्यात सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये उडालेल्या चकमकीत अनंतनाग जिल्ह्यात नासीर अहमद मीर या युवकाचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमधील हिंसाचारात आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या ७३ वर जाऊन पोहोचली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तासभर चर्चा केली.

सलग ६० व्या दिवशी काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले होते. दक्षिण काश्मिरातील सीर हमदन भागात सुरक्षा दलांवरील दगडफेकीला उत्तर देताना केलेल्या दलाने केलेल्या गोळीबारात नासीरचा मृत्यू झाला. यात इतर काही जण जखमी झाले. जखमींत निदर्शक महिलाही होत्या. जखमींना लगेच रुग्णालयात नेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

रविवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याला भेट दिली होती. त्या भेटीबद्दल त्यांनी पंतप्रधानांना अवगत केले. बुऱ्हान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला हिंसाचार दोन महिन्यांनंतरही थांबलेला नाही. रविवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाशीही बोलण्यास तेथील फुटीरवादी नेत्यांनी नकार दिला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या वरचेवर दिलेल्या काश्मीर भेटीही व्यर्थ जात आहेत. दुसरीकडे श्रीनगरमध्ये बहुतांश भागात संचारबंदी उठवली गेली आहे. परंतु खोऱ्यात काही दिवसांपूर्वी संचारबंदी उठवली होती. मात्र परिस्थिती सुधारत असतानाच फुटीरतावादी नेत्यांनी संप निदर्शने करून खोऱ्यात स्थिती बिघडवली. सरकारने फुटीरवादी गटांशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

संप सुरूच असल्याने अडचण
फुटीरतावाद्यांनी सप्टेंबरपर्यंत संप सुरूच ठेवला आहे. महिलांचा दर आठवड्याला निदर्शने करण्याचा कार्यक्रम सुरूच असून मंगळवारी त्यांनी शांततामय निदर्शने करून संपात १२ तासांची विश्रांती दिली. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप हे सलग अनेक दिवसांपासून बंद आहेत. आताशा दिवसा बंद असणारी ही प्रतिष्ठाने सायंकाळी सुरू होतात. दिवसा मात्र सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंदच असते. मात्र, सरकारी कार्यालये, बँकांमध्ये आता उपस्थिती वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीत अंशत: सुधारणा झाल्याचे दिसते.

‘सीमेवर अधिक लक्ष द्या, गुंतवणूकही करा
नवी दिल्ली - भारताच्या संवेदनशील सीमांना त्यांच्या रक्षणासह त्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची तिथे काही गुंतवणूक करून तेथील लोकांची त्या भागात विकासकामे करण्याचीही तीव्र गरज आहे. कारण हे सीमेवरील जम्मू-काश्मीर राज्य अनेक वर्षांपासून सीमेपलीकडून होत असलेल्या छुप्या युद्धाचा घुसखोरीचा वर्षाचे ३६५ दिवस सामना करत असते, असे विधान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपान एन. एन. व्होरा यांनी आज येथे केले. ते येथे होमलँड सिक्युरिटी, स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट या विषयावरील अधिवेशनात बोलत होते. याचे आयोजन फिक्कीने केले होते. सीमांचे रक्षण करणे ही फक्त लष्कर, केंद्राचीच नव्हे, तर तिथे राहत असलेल्या लोकांचीही जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...