आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर इंजीनिअरचे छायाचित्र दहशतवादी म्हणून whats app वर झाले Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सॉफ्टवेअर इंजीनियर अहमद शहरोज खान (डावीकडून)

जालंधर- काश्मीरमधील एका सॉफ्टवेअर इं‍जीनिअरचे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर दहशतवादी म्हणून व्हायरल झाले आहे. छायाचित्र व्हायरल होताच खुद्द इंजीनियरने पोलिसांची भेट घेऊन सत्य माहिती सांगितली आहे. अहमद शहरोज खान (26) असे युवकाचे नाव असून तो काश्मीरमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे

मित्राने दिली माहिती
अहमद शहरोज खान सोमवारी नाइट शिफ्टला असताना त्याला मित्राचा फोन आला. खानचे छायाचित्र व्हॉट्सअप पोस्ट झाले असून त्याला दहशतवादी संबोधले असल्याचे तो म्हणाला. दीनानगरमधील पोलिस ठाण्यावरील दहशतवादी हल्ल्यातील पळून गेलेला दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. हे ऐकून खानला प्रचंड धक्का बसला आणि त्याने तत्काळ पोलिस ठाणे गाठले.
सर, मी दहशतवादी नाही!
शहरोज मंगळवारी स्वत:हून मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात पोहोचून अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना सत्य माहिती सांगितली. शहरोजने पोलिसांनी सांगितले की, तो दहशतवादी नाही. कोणी तरी खोडकरपणा केला आहे. त्यावर पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजरला बोलावून त्यांना विचारपूस करून शहरोज खानला क्लीनचिट दिली आहे.
एसीपी बलविंदर इकबाल सिंह म्हणाले, शहरोजसोबत कोणी खोडी केली आहे. त्यामुळे मात्र त्याला विनाकारण मनस्ताप झाला. शहरोजचे वहील जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी इंजीनिअर असून त्याची बहिण डॉक्टर आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरदासपुरमधील दीनानगर पोलिस ठाण्यात दहशतवादी हल्ला झाला होता. हत्यात ठाण्याचे एसपी शहीद झाले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, व्हॉट्‍सअॅपवर शेअर झालेला फोटो...
बातम्या आणखी आहेत...