आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानच्या गृहमंत्र्यांचे आक्षेपार्ह्य वक्तव्य, मनमोहनसिंगाबद्दल मंचावरुन अपशब्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात माजी पंतप्रधानांबद्दल अपशब्द - Divya Marathi
भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात माजी पंतप्रधानांबद्दल अपशब्द
चूरु - राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी रविवारी चूरु येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य कॉमेंट केली. एवढेच नाही, 8 वेळा एक शिवी दिली. ते म्हणाले, 'मनमोहन अमेरिकेला जात होते, तेव्हा त्यांना रिसिव्ह करण्यासाठी ऐरा-गैरा नत्थू खैरा मंत्री जात होता. आता मोदी जातात तेव्हा स्वतः राष्ट्रपती बराक ओबामा त्यांच्या स्वागताला उपस्थित असतात.'

वादानंतर काय म्हणाले कटारिया..
- मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळावर टीक करताना कटारिया म्हणाले, की तो सर्वात वाईट काळ होता. तेव्हा काही नेते चारा खात होते, तर काही कोळसा खाऊन तुरुंगात गेले. मनमोहनने देशाला घोटाळ्याचा देश करुन टाकले होते.
- काँग्रेसवर बरसताना कटारिया म्हणाले, 'देशाला बर्बाद करणारी कोणती फौज असेल तर या पक्षाच्या नेत्यांची फौज आहे.'
- त्यांच्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर कटारियांनी उशिरा रात्री आपल्या फेसबुक पेजवरुन माफी मागितली. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले, 'मी कोणाबद्दलही अपमानास्पद काही बोललो नाही. मात्र माझ्या भाषणामुळे कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.'
बातम्या आणखी आहेत...