अमृतसर/चंडीगड- भारत आणि पाकिस्तान फाळणीत एकाच राष्ट्राचे दोन तुकडे झाले होते. त्यामुळे काश्मिरचा वाद अजूनही दोन्ही राष्ट्रांत सुरू आहे. मात्र, पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यात असलेले हिंदुंचे तीर्थस्थळ 'कटासराज' मंदिराचे महत्त्व आजही कायम आहे.
आख्यायिकेनुसार, शिवशंकराच्या अश्रुंचे दोन थेंब पृथ्वीवर पडले होते. त्यातील एक थेंब राजस्थानातील पुष्कर येथे तर दुसरा थेंब पाकिस्तानातील कटासराज येथे पडला होता.
पाच पांडव वनवासात असताना युधिष्ठिराने कटासराज येथेच शिवरूप धारी यक्षासोबत संवाद साधला होता. त्यामुळे पाकिस्तानातील कटासराज येथील मंदिराला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पुष्कर आणि कटासराज येथे शिवरात्री आणि
महाशिवरात्रीला यात्रा भरते. एवढेच नव्हे तर ब्रिटिश राजवटीतही कटासराज मंदिर प्रसिद्ध होते ब्रिटिश अधिकारी कटासराज मंदिरात भरणार्या कुंभमेळ्यात सहभागी होत असत.
पाकिस्तानातील कटासराज या मंदिराचे धार्मिक माहात्म्य भारतीय संशोधक अखिलेष झा यांनी ‘द ब्रिटिश अकाउंट ऑफ कटासराज’ या पुस्तकात सांगितले आहे. अखिलेश झा हे 1996 बॅचचे सिव्हिल सेवा अधिकारी आणि राष्ट्रीय आर्थिक प्रबंधन संस्था, फरीदाबाद येथील प्राध्यापक आहेत. झा यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासावर एकूण 17 पुस्तके लिहिली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, पाकिस्तानातील कटासराज मंदिराचे फोटो...