आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ हजार फुटांवर शून्य अंश तापमानात ७ मिनिटे कथ्थक, श्वास घेणेही कठीणच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचलमधील लाहौल स्पितीची बारालाचा खिंड. उंची १७,१९८.१६ फूट (जवळपास ५२४२ मीटर). सर्वसामान्यपणे येथे श्वास घेणेही कठीणच. पण पतियाळाच्या श्रुती गुप्ता हिने येथे सात मिनिटे कथ्थक नृत्य केले आणि सर्वाधिक उंचीवर कथ्थक करण्याचा विक्रम केला. लिम्का बुक २०१६ च्या जागतिक विक्रमात त्याची नोंद करणार आहे. श्रुतीने रविवारी केलेल्या या नृत्याला ‘प्रकृती निर्वाण रूपम’ असे नाव देण्यात आले आहे. श्रुती म्हणाली, ‘कथ्थकच्या वेशात शून्य अंश सेल्सियसमध्ये नृत्य करणे आणि श्वास घेणे खूप कठीण होते. गेल्या ६ महिन्यांपासून मी त्यासाठी तयारी करत होते.’ तिने ही कामगिरी पर्वतीय भागात देशाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असलेल्या जवानांना समर्पित केली आहे.