आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी बिहारचा पालक नाही, तर शकुनीमामा : काटजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटला दाखल झाला असतानाही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा राज्याविषयी प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.

त्यांनी बिहारच्या जनतेला त्यांच्याविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघटनेत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या एका पोस्टमध्ये काटजूंनी लिहिले की, जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते तेव्हा तिने स्वसंरक्षणार्थ भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली होती. दुसऱ्या पोस्टमध्ये काटजू लिहितात, ‘नितीशजी मी बिहारी जनतेचा पालनहार नव्हे, तर शकुनी मामा आहे.’ मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना ‘माय-बाप’ संबोधले होते. त्यावर काटजूंनी प्रतिक्रिया दिली.
या पोस्ट टाकण्याच्या आदल्या दिवशी काटजूंनी फेसबुकवर लिहिले होते की, पाकिस्तानला काश्मीर हवा असल्यास त्यांना बिहारदेखील घ्यावा लागेल. यानंतरच बिहारमध्ये सत्ताधारी जदयूचे आमदार नीरज कुमार यांनी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरला.

त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या १५३(बी), ५०५(२) आणि माहिती तंत्रज्ञान कलम ५६ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. काटजूंनी नंतर सारवासारव करत म्हटले होते की आपण मिश्किलपणे ते म्हटले होते. ते फार हेतुपुरस्सर केलेले वक्तव्य नाही.
बातम्या आणखी आहेत...