आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kautilya Pandit India Google Boy Birthday Celebration

कौटिल्यच्या वाढदिवसाला आले ग्लोबल रूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरौंडा (हरियाणा) - गुगलबॉय कौटिल्यची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे. त्याचा प्रत्यय त्याच्या सहाव्या वाढदिवसाला आला. कौटिल्यचा वाढदिवस एखाद्या सेलिब्रिटीसारखा साजरा झाला. यानिमित्त अनाज मंडी भागातील सामुदायिक केंद्रात हजारो लोक जमले होते. त्यांनी गुगलबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार नवीन जिंदाल यांनी हेलिकॉप्टरने येऊन कौटिल्यचे अभीष्टचिंतन केले. सिंगापूरहून विनी लॅम्ब र्मकन यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. यानिमित्त 101 दिव्यांची आरास, फुग्यांची सजावट, केक असा थाट होता.