आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात लोक रस्त्यावर उतरले, बंदमुळे जनजीवन विस्कळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. राज्याच्या विविध संघटनांच्या बंदच्या आवाहनामुळे दक्षिण कर्नाटकच्या जिल्ह्यांत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

१३५ वर्षे जुना वाद
तामिळनाडूला दररोज १५००० क्युसेक पाणी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नदीच्या पाण्याच्या वाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यादरम्यान दीर्घ कालावधीपासून वाद सुरू आहे. नदीच्या पाण्याचा वाद सुमारे १३५ वर्षे जुना आहे.

> राज्यात १००० पेक्षा जास्त संघटनांनी शुक्रवारी बंदचे आवाहन केले होते. म्हैसुरू, मांड्या, हासन, चामराजनगर, कोडुगू आणि बंगळुरू जिल्ह्यात बंदचा मोठा प्रभाव जाणवला. ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसह सार्वजनिक वाहने रस्त्यांवरून धावलीच नाहीत.
> राज्यातील दुकाने, शाळा आणि महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका, सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील आयटी कंपन्याही बंद होत्या.
> मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक बोलवावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
बातम्या आणखी आहेत...