आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KBC ला रायपूर महापालिकेचे अल्टिमेटम, भाडे भरा नाही तर शुटींग बंद करू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड) - प्रसिद्ध टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'चे रायपूर येथे होणारे शुटींग अडचणीत आले आहे. येथील इनडोअर स्टेडियममध्ये केबीसीचे शुटींग होणार आहे. मात्र, पालिकेच्या मालकीच्या या स्टेडियमचे भाडे केबीसीच्या निर्माता कंपनीने अद्याप भरलेले नाही, त्यामुळे महापौरांनी भाडे जमा करत नाही तोपर्यंत सेटला कुलूप ठोकण्याचे सांगितले आहे.
रायपूर येथील हॉटेल ताज गेटवेमध्ये 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या टीव्ही शोमध्ये सहभागी होणार्‍या लोकांचे ऑडिशन होणार आहे. त्यासाठी जवळपास 1000 लोक येणार आहेत आणि त्यातील 500 लोकांची निवड केली जाईल. त्यानंतर शहरातील इनडोअर स्टेडियममध्ये केबीसीचे शुटींग होणार आहे. मात्र, रायपूर महानगर पालिकेने शोच्या निर्मात्यांना शुटींगस्थळाचे भाडे जमा करण्यासाठी मंगळवार सायंकाळची वेळ दिली आहे. महापौर किरणमयी नायक यांनी झोन अधिकार्‍यांना निर्धारित वेळेच्या आत भाडे जमा झाले नाही तर, सेटला टाळे ठोकण्यास सांगितले आहे.
निर्माता कंपनीचा आरोप - पाससाठी अधिकार्‍यांची बळजबरी
केबीसी शोच्या आयोजनाची तयारी करत असलेल्या लोकांचा आरोप आहे, की सरकारी अधिकारी पास साठी त्यांना धमकावत आहेत. या शोच्या शुटींगची तयारी करत असलेले सोनी कंपनीचे मॅनेजर यांनी याची तक्रार मुख्य सचिव विवेक ढांड यांना केली आहे. मॅनेजरचे म्हणणे आहे, की ढांड यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की एकाही अधिकार्‍याला पास द्यायचा नाही. पालिकेच्या अधिकार्‍यांबरोबरच पोलिस मुख्यालयातूनही पाससाठी फोन येत असल्याचे मॅनेजरने सांगितले आहे.
स्टेडियमचे भाडे 1.84 लाख रुपये
महापौर किरणमयी नायक यांनी सांगितले आहे, की भाडे जमा केल्याशिवाय स्टेडियममध्ये स्टेज तयार करण्याची परवानगी देता येणार नाही. या प्रकरणी सोनी कंपनी पालिकेला अंधारात ठेवत आहे. 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत सोनीने स्टेडियम बुक केले आहे. त्याचे एका दिवसाचे भाडे 1 लाख 34 हजार रुपये आहे, एसीसह त्याचा दर 1 लाख 84 हजार रुपये आहे. त्यांनी 26,27 आणि 28 सप्टेंबर हे तीन दिवस एसीसह आणि उर्वरित दिवसांमध्ये नॉन एसी बुकींग केले आहे. बुकींग होऊन चार दिवस झाले तरी, अद्याप सोनी कंपनीने पूर्ण भाडे जमा केलेले नाही.

काय आहे प्रकरण
रायपूर महापालिकेच्या इनडोअर स्टेडियमवर 28 सप्टेंबर रोजी कौन बनेगा करोडपती या शोचा एक एपिसोड शुट होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री रमणसिंह उपस्थित राहाणार आहेत. या शोच्य निर्माता कंपनीने स्टेडियमच्या 18 लाख रुपये भाड्यापैकी केवळ 2 लाख रुपये जमा केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे, की आरटीजीएस (Real-time gross settlement) द्वारे जमा करण्याचे सांगितले होते. अद्याप पैसे जमा न केल्यामुळे महापौर संतप्त झाले आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रायपूर येथे सुरु असलेल्या शुटींगची तयारी