हैदराबाद- देशातील 29 व्या तेलंगना राज्याचे नेतृत्त्व करणारे केसीआर अर्थात के.चंद्रशेखर राव यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. हैदराबादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठाबाहेर हे मंदिर आहे. युवा समर्थकांनी के. चंद्रशेखर राव यांचे मंदिर उभारून अनोख्या पद्धतीने त्यांचे आभार मानले आहे.
युवा कार्यकर्त्यांनी मंदिरात केसीआर यांचे एक डिझिटल छायाचित्र ठेवले आहे. या मंदिराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन 'जय तेलंगना'च्या घोषणाही देतात. गेल्या आठवड्यात हे मंदिर उभारण्यात आले आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी विद्यमान मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मोठे योगदान दिले होते. या निमित्त केसीआर यांचे मंदिर उभारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, तेलंगणात उभारले होते सोनिया गांधींचे मंदिर...
(फोटोः हैदराबादमध्ये उभारले केसीआर मंदिर)