आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी तिजोरीतून तिरुपतीला दान केले 5.43 कोटींचे दागिने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद-  हे छायाचित्र आहे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर) यांचे. बुधवारी ते दोन विशेष विमानांनी संपूर्ण कुटुंब व अर्धे मंत्रिमंडळ घेऊन तिरुपतीच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले. 
 
तेथे विशेष पूजा केल्यानंतर त्यांनी मंदिराला  सरकारी तिजोरीतून ५.४३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले. त्यात ३.७० कोटी रुपयांची १४.२० किलो सोन्याची शालिग्राम माला आणि १. २० कोटी रुपयांचा ४.६५ किलो वजनाचा कंठहार आहे.
 
वेगळ्या तेलंगणचा नवस पूर्ण झाल्यामुळे हे दागिने अर्पण केले, असे केसीआर यांचे म्हणणे आहे.ऑक्टोबर २०१६ मध्ये  त्यांनी वरंगलच्या भद्राकाली मंदिराला साडेतीन कोटींचे दागिने दान केले होते. त्याच्या विरोधात उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
 
दानधर्मावर कोट्यवधी खर्च 
मागील वर्षी ७ कोटी खर्चून यज्ञ केला. ५.४५ कोटी तिरुपती, ३.५० कोटींचे दागिने भद्राकाली मंदिराला दान. १२ हजार मंदिरात पूजा करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले.
वास्तुविशारदाला मंत्र्याचा दर्जा
- मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या खासगी वास्तुविशारदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन टाकला आहे.
- मागील वर्षी हैदराबादेत ५० कोटींत नवे मुख्यमंत्री निवासस्थान बांधले.
 
...आणि तेलंगण राज्याची ही स्थिती
- तेलंगण राज्यावर एकूण १.२३ लाख कोटी रुपयांचे  आणि  राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर  ३५ हजार रुपये सरकारी कर्जाचा बोजा आहे.
- २०१४ मध्ये  आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन वेगळे  तेलंगण राज्य झाल्यावर आजपर्यंत २७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...