आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथमध्ये पुन्हा ढगफुटी; चमोली जिल्ह्यातील नंद्रप्रयागमध्ये दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- चमोली जिल्ह्यात नंदप्रयागजवळ दोन ठिकाणी पुन्हा ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून एका महिलेचा त्यात समावेश आहे. एक तरुणी अद्याप बेबत्ता आहे. ग्रामीण भागातील लोकांनी भीतीमुळे घरदार सोडून दुसरीकडे स्थलांतर केले आहे. तसेच पाचशे नागरीकांवर शाळा, महाविद्यालयाचा आश्रय घेण्याची वेळ आली आहे.

सुनाली गावाजवळ असलेल्या डोंगरावर ढगफुटी झाली. त्यामुळे कोसळलेल्या दरडीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. त्यानंतर सकाळी सात वाजता तेफना-बांतोली गावांवर ढगफुटी झाली. त्यात दोन्ही गावांत दाणादाण उडाली.

छायाचित्र: केदारनाथजवळील डोंगरावरील गांधी सरोवर (चोरबाडी झील)