आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedarnath Temple To Reopen On May 4, Challenges Remain For Govt

केदारनाथचे द्वार 4 मे रोजी उघडणार; सहा महिन्यांनंतर भाविकांना दर्शनाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपेश्वर - गेल्या सहा महिन्यांपासून थंडी आणि बर्फामुळे बंद असलेले केदारनाथ मंदिर 4 मे रोजी पुन्हा खुले होणार आहे. थंडीच्या काळात येथे दर्शन करता येत नाही.

एका विशिष्ट समारंभानंतर हे मंदिर भगवान केदारनाथांच्या दर्शनासाठी खुले होईल. 4 मे रोजी पहाटे 6 वाजता धार्मिक विधी पूर्ण करण्यात येईल, असे बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीकडून स्पष्ट करण्यात आले. बद्रीनाथ (चामोली) 5 मे रोजी, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी 2 मे रोजी गंगोत्री-यमुनोत्री सुरू होईल. गेल्या वर्षी महावादळात व्यवस्था कोलमडून पडली होती.