आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना रात्रीच्या वेळी घरात ठेवा; छेडछाड काढण्याच्या प्रकरणावर बोलल्या खासदार किरण खेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रमात बोलताना किरण खेर. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
एका कार्यक्रमात बोलताना किरण खेर. (सांकेतिक फोटो)
चंदीगड- मुलांना रात्रीच्या वेळी घरात ठेवा, असा सल्ला भाजपच्या खासदार किरण खेर यांनी दिला आहे. छेडछाड झालेल्या IAS अधिकारी वीरेंद्र कुंडू यांची मुलगी वर्णिकाला सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे की ती एवढ्या रात्री बाहेर काय करत होती. यावर खेर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वर्णिकाची छेड काढणाऱ्या विकास बराला आणि अन्य एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विकासवर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुलांमुळे प्रॉब्लेम आहे तर त्यांनाच घरात ठेवा
- किरण खेर म्हणाल्या की, मुलांमुळे प्रॉब्लेम आहे तर त्यांनाच रात्रीच्या वेळी घरात ठेवले पाहिजे. जर रात्री मुलांपासून धोका असेल तर त्यांनी दिवसाच नाही तर रात्रीही घराबाहेर पडू नये.
- वर्णिकाची छेड काढणाऱ्या विकास बराला याने मद्यपान केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...