आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अखेर केजरीच झुकले', चिदंबरम यांना दिल्लीचे वकील बनवल्यानंतर माकन यांचा टोमणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आप सरकारने सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी चिदंबरम यांना वकिलांच्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतले आहे. - फाइल - Divya Marathi
आप सरकारने सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी चिदंबरम यांना वकिलांच्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतले आहे. - फाइल
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीच्या अधिकारांप्रकरणी सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा समावेश वकिलांच्या पॅनलमध्ये केला आहे. त्यावरून दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना टोमणा मारला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, अभिनंदन चिदंबरम जी. केजरीवाल यांनी तुम्हाला आरोपांतून मुक्त केले. अखेर त्यांना तुमच्याच पाया पडावे लागले. आपने 2014 मध्ये चिदंबरम यांच्यासह देशातील बड्या नेत्यांची  एक यादी जाहीर केली होती. ते सर्व नेते भ्रष्टाचाकी असल्याचे म्हटले होते. 

आता AAP चिदंबरम यांची माफी मागणार का.. 
- दिल्ली सरकारचे वकील बनल्यानंतर माकन यांनी चिदंबरम यांचे अभिनंदन केले. तसेच आता AAP माफी मागणार का असा सवालगी त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे. 
- त्याशिवाय माकन यांनी पवन खेर नावाच्या एका यूझरलाही रिट्वीट केले. त्यात लिहिले होते, जर केजरीवाल यांच्यात लाज शिल्लक असेल तर त्यांनी चिदंबरम यांच्याकडून सेवा घेण्याआधी सर्वांसमोर माफी मागायला हवी. 

काय आहे प्रकरण...
- दिल्ली सरकारांच्या अधिकारांसंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. केंद्रशासित प्रदेशात उपराज्यपाल प्रशासकीय प्रमुख असल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला त्यांना आवाहन दिले होते. 
- याच प्रकरणासाठी दिल्ली सरकारने बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी चिदंबरम यांच्यासह 5 वरिष्ठ वकिलांचे पॅनल तयार केले आहेत. त्याच चिदंबरम यांचा समावेश आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...