आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kejriwal Promises Holy City Status To Amritsar Ban Meat Alcohol Around Golden Temple If Aap Wins In Punjab

अमृतसरला पवित्र शहराचा दर्जा देईल अापचे सरकार; केजरीवालांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- आप संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबच्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अमृतसरमध्ये आले. त्यांनी श्री हरमंदिर साहिबचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यास अमृतसरला पवित्र शहराचा दर्जा देण्याची घोषणा केली.

याशिवाय, आनंदपूर साहिबला धार्मिक नगरीच्या धर्तीवर विकसित केले जाईल. दोन्ही शहरांत तंबाखू, मांस आदींवर बंदी घातली जाईल.

अमृतसरला पूर्णपणे व्यसनमुक्त केले जाईल. दरबार साहिबच्या आसपास दारू आणि मांसविक्रीवर बंदी घातली जाईल. त्यांनी सांगितले की, आपचा लढा भ्रष्टाचार व्यसनाधीनतेविरुद्ध असून तो निर्णायक वळणावर आला आहे. आमचे सरकार आल्यास अमृतसरमध्ये मद्यविक्री बंद केली जाईल.

दोनगाड्यांची धडक, मुख्यमंत्री सुरक्षित : अमृतसरमार्गावर जालंधरनजीक केजरीवाल यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांची धडक झाली. अपघातात केजरीवाल यांना काहीही इजा झाली नाही तसेच अन्य कोणी जखमीही झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल ज्या गाडीत बसले होते,त्या गाडीने ताफ्यातील समोरच्या गाडीला धडक दिली. यामुळे केजरीवाल यांच्या गाडीच्या बोनेटचे नुकसान काहीसे झाले.

मोठा विरोध
केजरीवालयांना विरोध करण्यासाठी सकाळी वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र जमू लागले होते. त्यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. पंजाबमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे कडेकोट सुरक्षेत त्यांना दरबार साहिबच्या आतमध्ये नेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...