आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala Businessman Arrested For Hitting Guard With Hummer Car, Thrissur

गेट उघडण्यास उशीर झाल्याने गार्डवर चढवली हमर, आधी मुलाने चालवली होती फेरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - इनसेटमध्ये आरोपी बिझनेसमॅन, फोटोत त्याची गाडी हमर दिसत आहे.
त्रिशूर - वादग्रस्त विडी उद्योगपती मोहम्मद निशाम यांना त्यांच्या गार्डच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे. गेट उघडण्यास उशीर झाल्याने निशाम यांनी गार्डवर थेट गाडी चढवली आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
निशाम यांचे नाव यापूर्वीही विदांमध्ये आलेले आहे. आपल्या 9 वर्षांच्या मुलाला फेरारी चालवायला लावल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच दारुच्या नशेत एका महिला पोलिस सब इन्स्पेक्टरला रॉल्स रॉयस कारमध्ये डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारची आहे. सेक्युरिटी गार्ड चंद्रबोसने सोसासायटीचे मेनगेट उघडण्यास उशीर केला होता. त्यानंतर निशाम यांनी त्याच्यावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गार्ड ने एका कारंजाच्या मागे लपून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण निशाम यांनी त्यांच्या हमर गाडीने त्याला भींतीला दाबून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर लोखंडी सळईने त्याला मारहाणही केली.
गार्डच्या इतर सहकार्‍यांनी कसाबसा त्याचा जीव वाचवला. सध्या तो गार्ड व्हेंटिलेटरवर आहे. निशाम यांची विडीची कंपनी आहे तसेच ते तंबाखू सप्लायरही आहेत. त्यांचा हॉटेल आणि ज्वेलरीचा व्यवसायही आहे. त्यांच्याकडे बेंटले, रॉल्स रॉयस, एश्टन मार्टिन, रोड रेंजर, फेरारी आणि जगुआर या कार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, निशाम यांच्या 9 वर्षाच्या मुलाचा फेरारी चालवतानाचा व्हिडिओ. याप्रकरणानंतर निशाम यांना अटक झाली होती... पुढील स्लाईडवर बघा त्यांच्याकडे असलेल्या इम्पोर्टेड कार...