आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्कमध्ये बसलेल्या प्रेमीयुगुलाची पोलिसांनी घेतली शिकवणी; तरुणाने केले FB Live

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवअनंतपुरम- केरळ पोलिसांनी पार्कमध्ये बसलेल्या प्रेमीयुगुलाची चांगलीच शिकवणी घेतली. त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळख पत्र न दिल्याने त्यांना थेट पोलिस ठाण्यात नेले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. उल्लेखनिय म्हणजे, प्रेमीयुगुलाने फेसबुक व्हिडिओ स्ट्रीमिंग फीचरच्या माध्यमातून लाइव्ह पोस्ट केले आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय म्हटले प्रेमीयुगल?
- विष्णु आणि आरतीने सांगितले की, मंगळवारी सकाळी 11 वाजता ते थिरुअनंतपुरममध्ये एका गार्डनमध्ये बसले होते. तिथे एक महिला कॉन्स्टेबल आली. 
- कॉन्स्टेबलने विष्णु आणि आरतीला प्रश्नांची सरबत्ती केली. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन संवाद साधणार्‍या प्रेमीयुगुलाला नैतिकतेचा पाठही शिकवला. इतकेच नाही तर पब्लिक प्लेसवर अश्लील चाळे केल्याचा आरोप केला.
- पार्कमध्ये बसणे काही गुन्हा नाही. प्रेमीयुगुलांना पोलिस विनाकारण त्रास देत असतील तर त्यांचे व्हिडिओ स्ट्रीमिंग करून सत्य जगासमोर आणायला हवे. 
- प्रेमीयुगुलाने शेअर केलेला व्हिडिओ एका दिवसात 55000 यूजर्सनी पाहिला आहे.

3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आहे तरी काय?
- प्रेमीयुगुलाने शूट केलेला व्हिडिओ 3 मिनिटांचा आहे. दोन महिला कॉन्स्टेबल पार्कमध्ये येतात. 'तुम्ही विवाहीत आहात काय?' असा प्रश्न हिरवळीवर बसलेल्या प्रेमीयुगुलाला करतात. 
- 24 वर्षीय विष्णु 'फेसबुक लाइव्ह व्हिडिओ सुरु करतो. विष्णु उत्तर देतो- 'नाही, पण लवकरच आम्ही विवाह करणार आहे. त्यावर पोलिस कॉन्स्टेबल त्यांना नैतिकतेचा पाठ शिकवते. 
- थोड्याच वेळात ती आपल्या पुरुष सहकार्‍यांना बोलवून घेते. पोलिस कॉन्स्टेबल प्रेमीयुगुलांला प्रश्नांची सरबत्ती देतो. ओळखपत्र न दिल्याने पोलिस ठाण्यात नेण्याची धमकीही देतो. 
- 'आम्ही कुठे अश्लिल चाळे केले? आम्ही केवळ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन चर्चा करतोय. तुम्ही आम्हाला त्रास देऊ शकत नाही.', असा जाब विष्णु, पोलिसांना विचारतो. 

पोलिसांनी ठोठावला 200 रुपयांचा दंड
- नंतर पोलिसांनी प्रेमीयुगुलाला ठाण्यात नेले. पार्कमध्ये अश्लील चाळे केल्याचा त्यांच्यावर आरोप केला. सार्वजनिक स्थळाची शांतता भंग केल्याचा प्रेमीयुगुलावर 200 रुपयांचा दंड ठोठावला. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, प्रेमीयुगुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...