आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala Court Order To File FIR Against Chief Minister Oommen Chandy

केरळ: CM चांडींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिला FIR दाखल करण्याचा आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम - केरळच्या सौर उर्जा घोटाळ्यात नाव आल्यानंतर मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या संकटात भर पडताना दिसत आहे. त्रिशूर कोर्टाने गुरुवारी चांडी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. चांडी यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांची 14 तास चौकशी
- सोलर पॅनल घोटाळ्यात मुख्यमंत्री चांडी यांचे नाव आल्यानंतर चौकशी समितीने 14 तासांपेक्षा जास्त त्यांची चौकशी केली. बुधवारी ते साक्षीदार होण्यास तयार झाले.
- चांडी म्हणाले, की त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची गरज नाही. त्यांनी जे काही केले ते चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. चांडी म्हणाले, सर्व आरोप हे राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आले आहे.
- विरोधीपक्ष नेते व्ही.एस. अच्युतानंदन म्हणाले, चांडी खोटे बोलत आहेत. जर ते खरं बोलत आहेत तर पॉलिग्राफी टेस्टला त्यांनी नकार का दिला.

काय आहे सोलर घोटाळा
- 2013 मध्ये सोलर एनर्जी प्रॉजेक्ट संबंधी एका खासगी कंपनीतील आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा झाला.
- या घोटाळ्यात कंपनीचा संचालक राधाकृष्णन आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर सरिता नायर मुख्य आरोपी आहे.
- घोटाळ्यातील तिसरी आरोपी एक लेडी डान्सर - अॅक्ट्रेस शालू मेनन आहे. ती सरिताची निकटवर्तीय मानली जाते.
- या सर्वांविरोधात राज्यभरातून मिळालेल्या तक्रारीनुसार 40 हून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत.
- बनावट कंपन्या स्थापन करुन सोलर प्रॉजेक्टच्या नावाखाली केरळ आणि तामिळनाडूच्या हजारो लोकांना गंडा घालण्यात आला आहे.

चांडींवर काय आरोप
- आरोपी सरिता नायरने मुख्यमंत्री चांडी यांच्यावर सचिवाच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची लाच घेण्याचा आरोप केला आहे.
- आणखी एका आरोपीने चौकशी समितीसमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे, की मुख्यमंत्री चांडी आणि त्यांच्या दोन मंत्र्यांनी सरिताचा सेक्सुअली वापर केला होता.
- पत्नीच्या हत्येचा आरोप असलेल्या राधाकृष्णन याने चांडी यांच्यावर 5.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता.