आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्‍या ग्रुपने केल्‍या सात पाकिस्‍तानी वेब साइट हॅक, दिली शहिदांना श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगलूरू - केरळच्‍या 'ब्‍लॅक हॅट्स' नावाच्‍या एका ग्रुपने पाकिस्‍तानातील सात प्रमुख वेबसाइटट्स हॅक करून पठाणकोट हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. एवढेच नाही तर या ग्रुपने या वेबसाइट्सचा पूर्ण आकार बदलला असून, हे हॅकिंग शहीद नीरंजनकुमार यांच्‍या दीड वर्षीय मुलीला समर्पित केले.
या ग्रुपने म्‍हटले, '' आम्‍ही पाकिस्‍तानातील 7 बेवसाइट्स हॅक करून पठाणकोट हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या सर्व जवानांना श्रद्धांजली देण्‍याचा छोटासा प्रयत्‍न केला. मात्र, या बेवसाइट्सवरील कुठलाही मजकूर डिलिट केला नाही किंवा इतर काही आक्षेपार्ह केले नाही. केवळ शहीद नीरंजनकुमार यांच्‍या चिमुकलीचा फोटो मुखपृष्‍ठावर लावला आणि शहिदांना श्रद्धांजली दिली. पाकिस्‍तानला संदेश देणे हाच एकमेव हेतू होता'', अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
बातम्या आणखी आहेत...