आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक आंतरजातीय विवाहाला \'लव्ह जिहाद\' म्हणता येणार नाही, केरळ हायकोर्टाचा निर्वाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमाला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा लागू होत नाहीत - हायकोर्ट - Divya Marathi
प्रेमाला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा लागू होत नाहीत - हायकोर्ट
कोच्चि - प्रत्येक प्रेम विवाहाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही असे केरळ हायकोर्टाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. कन्नूर येथील श्रुती आणि अनीस यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. श्रुतीने याचिकेत आपल्या पतीसोबत राहण्याची परवानगी मागितली होती. कोर्टाने आपल्या निकालात श्रुती आणि पती अनीसला एकत्रित राहण्याची परवानगी दिली आहे. श्रुती आणि अनीसचा विवाह हा कथित लव्ह जिहाद असल्याचा आरोप लावण्यात आला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. 
 
>> अनीसवर आरोप लावण्यात आले होते, की त्याने श्रुतीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केला. तसेच तिचे धर्मपरिवर्तन देखील केले. अनीसने श्रुतीसोबत बळजबरी हे दोन्ही प्रकार केले असे आरोप होते. 
>> हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार, "प्रत्येक प्रेम विवाह हा लव जिहाद आहे असे म्हणता येणार नाही. अशा प्रकारच्या (अनीस-श्रुती) विवाहांना समाजाने प्रोत्साहित करायला हवे. कारण, प्रेमाला कुठल्याही  मर्यादा लागू होत नाहीत." 
>> उल्लेखनीय बाब म्हणजे, केरळमध्ये कथित लव्ह जिहादचे एक प्रकरण चर्चेत असतानाच न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 
>> यापूर्वी केरळ हायकोर्टानेच हिंदू तरुणी हादिया आणि मुस्लिम युवक शफीन या दोघांचा विवाह रद्द केला होता. तसेच मुलीला आपल्या पालकांसोबत राहण्याचे आदेश दिले होते. शफीनने हादियाचे बळजबरी धर्मपरिवर्तन करून तिच्याशी निकाह केला असे आरोप होते. शफीन या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...