आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala Sex Racket Accused Nabbed From Cong Ex MLA’S Hostel Room

सेक्‍स व्हिडीओद्वारे NRI, नेत्यांना ब्‍लॅकमेल करणा-यास आमदार निवासातून अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुअनंतपुरम - केरळमध्ये एक हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणा-या आणि सेक्‍स व्हिडीओ तयार करून NRI व्यक्तींसह नेतयांना ब्लॅकमेल करणा-याला एका आमदाराच्या खोलीतून अटक केल्याने गोंधळ उडाला आहे.
विरोधी पक्षांनी या प्रकरणी चांगलाच गदारोळ घातला आहे. तर विधानसभा सचिवालयाने अवैधरित्या हॉस्टेलमध्ये राहणा-यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्ही जयचंद्रन नावाचा हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार आणि राज्‍याचे कांग्रेसचे महासचिव टी शरतचंद्र प्रसाद यांच्या खोलीत लपला होता.

एनआरआय, नेते उद्योगपतींना फसवले
जयचंद्रन एनआरआय, नेते आणि उद्योगपतींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. अशा लोकांना मुली पुरवून लपून त्यांची सेक्स व्हिडीओ क्लीप तो तयार करत होता. त्यानंतर या सर्वांना ब्लॅकमेल करून पैसे न दिल्यास कुटुंबीयांना हा व्हिडीओ पाठवण्याची धमकी द्यायचा. त्याच्या टोळीत काही महिलांसह एका वकिलाचाही समावेश आहे. या टोळीतील मुलीही सेक्सदरम्यान गुप्त कॅमे-याने व्हिडीओ तयार करायच्या. एका एनआरआयने कोची पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार
या टोळीकडून अनेक सीडी जप्त करण्यात आल्या आहेत. यात अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोणी खंडणी देण्यास तयार नसेल तर या टोळीतील तरुणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायच्या.

आमदाराशी संबंध असल्याचा आरोप
जयचंद्रन याच्या अटकेनंतर काँग्रेस नेत्यांचा त्याच्याशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात येत आहे. टी शरतचंद्र प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यातही जयचंद्रन आला होता, असेही सुत्रांनी सांगितले आहे. प्रसाद यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. प्रसाद यांनी आपली खोली सुनील कोट्टाराका नावाच्या एका व्यक्तीला दिली होती, असे सांगितले. जयचंद्रनला एक इव्हेंट मॅनेजरम्हणून ओळखत असल्याचेही ते म्हणाले.
फाइल फोटो : सेक्‍स रॅकेटच्या आरोपात अटक करण्यात आलेले आमदार व्ही जयचंद्रन