त्रिसर- केरळच्या शालेय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईला निमंत्रण पाठवले आहे. निमित्त आहे ओनम उत्सवाचे. मुलांना मलालासोबत या उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा आहे.
केरळमध्ये कृषी हंगाम अर्थात आेनमला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. कुनामुची या इवल्याशा गावातील वेगवेगळ्या शाळांतील मुलांनी मलालास आग्रहाचे पत्र पाठवले आहे. २७ ते २८ ऑगस्टदरम्यान हा उत्सव होणार आहे. ‘श्रेयस विद्यार्थी कुट्टायामा’ या विद्यार्थी संघटनेच्या वतीने यानिमित्ताने विविध हा कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. मलालाच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रम होतील. जागतिक पातळीवर मलालाने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तिच्या कार्याने ही मुले प्रेरित झाली आहेत. २० जुलै रोजी हे पत्र रवाना करण्यात आले आहे. १२ जुलै रोजी मलालाचा वाढदिवसही जल्लोषात साजरा करण्यात आला होता. दरम्यान, मलाला आणि भारतातील बाल हक्क मोहिमेचे कैलाश सत्यार्थी यांना गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला होता.