आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala Sunni Cleric Says Women Only Fit To Deliver Children

महिला फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी, पुरुषांची बरोबरी करू शकत नाहीत : मुस्लिम धर्मगुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ थिरुवनंतपूरम : केरळमधील एक सुन्नी धर्मगुरू कांथापुरम एपी अबूबकर मुस्लीयर यांनी जेंडर इक्विलिटी (लैंगिक समानता)ला 'गैर-इस्लामी' ठरवले आहे. शनिवारी एका कार्यक्रमात यांनी सांगितले की, 'महिला पुरुषांची बरोबरी कधीच करू शकत नाहीत, या केवळ मुलं जन्माला घालण्यासाठी आहेत.'

कोठे केले हे वक्तव्य
'ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल-ए-उलेमा' चे चीफ मुस्लीयर यांनी कोझीकोड येथे 'मुस्लिम स्टूडेंट्स फेडरेशन'च्या एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, जेंडर इक्विलिटी (लैंगिक समानता) कधीही वास्तवामध्ये साध्य होऊ शकत नाही. पुढे ते असेही म्हटले की, महिला पुरुषांची बरोबरी तसेच संकटाचा सामना करू शकत नाहीत. महिलांमध्ये बौद्धिक क्षमता आणि जगाला नियंत्रणात ठेवण्याशी ताकद नसते, कारण ही ताकद पुरुषांकडे अाहे. यावेळी त्यांनी एक प्रश्नही उपस्थित केला की, जगभरातील हजारो हार्ट सर्जनमध्ये एक तरी महिला आहे का?