आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशनरी हॉस्पिटलच्या नर्सवर गँगरेप, हात-पाय बांधून केले अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा हॉस्पिटल बाहेर तैनात पोलिस कर्मचारी - Divya Marathi
जिल्हा हॉस्पिटल बाहेर तैनात पोलिस कर्मचारी
राजपूर (छत्तीसगड) - येथील एका मिशनरी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षांच्या नर्सवर दोन अज्ञातांनी अमानूष अत्याचार केले. पीडितेचे हात-पाय बांधून तिच्यावर गँगरेप करण्यात आला. घटनेनंतर नर्सला उपचारांसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पीडितेने पोलिसांना सांगितले, की शुक्रवारी उशिरा रात्री दोन युवकांनी धाक-दपडशा दाखवून हात आणि पाय बांधले व दुष्कर्म केले. शनिवारी सकाळी सहकारी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पीडितेचे कपडे फाटलेले
रायपूरचे पोलीस अधीक्षक नीरज चंद्राकर यांनी सांगितले, की पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पीडितेचे हात-पाय बांधलेले होते आणि अंगावरील कपडे फाटलेले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नर्सला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. बलात्कार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहे.
केरळची आहे नर्स
मुळची केरळमधील नर्सवर कोणी अत्याचार केले याबद्दल हॉस्पिटलचा स्टाफ, पेशंट्स, त्यांचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली जात आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायचित्रे
बातम्या आणखी आहेत...