आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र, झारखंडच्या विद्यार्थ्यांचे विमान पाचवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहरदगा- झारखंड, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विमानाच्या मॉडेलने चीन जपानसारख्या देशांतील डिझाइनवर मात करत जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. अमेरिकत लॉस एंजलिस येथे २४ ते २६ एप्रिलदरम्यान ही स्पर्धा पार पडली.
अमेरिकत एसएई एअरो डिझाइन नावाची स्पर्धा गेल्या महिन्यात पार पडली. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग यूएसएने त्याचे आयोजन केले होते. यात ७५ देशांतील संघांनी भाग घेतला होता. त्यात भारतातील १० संघांचा समावेश होता. यात नागपूरचा श्रेयस मोंघटे जमशेदपूर एनआयटीचा विद्यार्थी लोहदरगाचा तरुण ऋषभ मिश्रा यांनी तयार केलेले मॉडेल पाचवे आले. त्यांनी तयार केलेल्या प्लेनचे वजन तीन किलाे अाहे. लांबी ६५ इंच रुंदी ९० इंच आहे. यात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम लावण्यात आली आहे, तर पंखांचे संचालन लिथियम पोलोराइड बॅटरीने केले जाते. इंजिन कॅस्टर ऑइलवर चालते. स्पर्धेत हे मॉडेल खूप चर्चेत राहिल्याचे ऋषभ, श्रेयसने सांगितले.

नागपूरचा श्रेयस मोंघटे जमशेदपूर एनआयटीचा विद्यार्थी ऋषभ मिश्रा यांनी तयार केलेले विमानाचे मॉडेल अमेरिकेतील स्पर्धेत पाचवे आले आहे. मॉडेलसोबत विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...