आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेप प्रकरणातील आरोपींच्या अटकेस खापचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर - गतवर्षीच्या भीषण दंगलीत विविध पाच गँगरेप प्रकरणातील 22 आरोपींना अटक करण्यास मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खाप पंचायतीने विरोध केला आहे.अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावात पाऊल ठेऊ दिले जाणार नाही,असे फुगना गावातील घाटवाला कौन्सिल खाप पंचायतीने जाहिर केले आहे.


घाटवाला खाप पंचायतीची बुधवारी गावात बैठक झाली.या बैठकीस हरियाणा खाप पंचायतीचे प्रमुख बलजितसिंह चौधरी यांनीही हजेरी लावली.या बैठकीत पोलिसांना गावात पाऊल ठेवू न देण्याचा ठराव करण्यात आल्याचे घाटवाला पंचायतीचे प्रमुख हरकिशनसिंह मलिक यांनी सांगितले. येत्या 9 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय खाप पंचायतीची गावात बैठक आयोजित करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.


मुजफ्फरनगर दंगलीचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने पाच गँगरेप प्रकरणातील एकूण 22 आरोपींची यादी स्थानिक पोलिसांना पाठवली होती.या आरोपींना अटक करण्याचे आदेश पथकाने दिले होते.या आरोपींपैकी वेदपाल या आरोपीस 24 जानेवारी रोजी अटक केल्यानंतर गावकरी आणि खाप सदस्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.