आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिमच्या इशाऱ्यावर अनेकांचे मर्डर, मृतदेह आश्रमात गाडले जात होते - साक्षीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खट्टासिंहचा दावा आहे की डेऱ्याची कसून चौकशी केली तर त्यात आरडीएक्स आणि इतरही अनेक घातक शस्त्र सापडू शकतात. - Divya Marathi
खट्टासिंहचा दावा आहे की डेऱ्याची कसून चौकशी केली तर त्यात आरडीएक्स आणि इतरही अनेक घातक शस्त्र सापडू शकतात.
मोहाली/चंदीगड - दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला राम रहिमवर खूनाचाही आरोप आहे. राम रहिमच्या इशाऱ्यावर अनेकांचा मर्डर करुन त्यांची बाहेर कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी मृतदेह आश्रमातच गाडण्यात आले, असाही आरोप आहे. हा दावा सीबीआयचा मुख्य साक्षीदार खट्टासिंह यांनी केला आहे. खट्टासिंह यांनी असाही आरोप केला आहे की जर आश्रम परिसराची कसून तपासणी करण्यात आली तर अनेक मानवी सांगाडे सापडतील. दरम्यान, बलात्कार पीडितांच्या वकीलांनी म्हटले आहे, की डेरा प्रमुखावर बलात्काराच्या 48 केसेस आहेत. त्याची शिक्षा वाढवण्यासाठी आम्ही अपील करणार आहोत. त्याच्यावर पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने तो जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचला आहे. 
 
कोण आहे खट्टासिंह
- खट्टासिंह 2002 च्या दरम्यान डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमचे ड्रायव्हर होते. राम रहिमवर जेवढे खटले दाखल आहे त्यात खट्टासिंह प्रमुख साक्षीदार आहे. साध्वी बलात्कार प्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती. 
- खट्टासिंह जेव्हा राम रहिमकडे ड्रायव्हर होते तेव्हाच साध्वींच्या बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. त्याच दरम्यान डेराचा मॅनेजर असलेल्या रणजीतची 10 जुलै 2002 ला हत्या करण्यात आली होती. 
- डेऱ्याला शंका होती की रणजीतनेच त्याच्या बहिणीकडून पत्र लिहून घेतले आहे. त्याचवर्षी बलात्काराच्या प्रकरणाच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या 'पूरा सच' सायं दैनिकाचे संपादक रामचंद्र छत्रपती यांचीही हत्या करण्यात आली होती. 
- खट्टासिंह 9 वर्षे राम रहिमचा ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांचा दावा आहे राम रहिमच्या इशाऱ्यावर अनेकांची हत्या करण्यात आली होती. त्यात गोरासिंह नावाच्या एका मुलाचाही समावेश आहे. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आश्रमातच त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. डेरा प्रमुखाने याची कानोकान खबर होऊ दिली नव्हती. 
- खट्टासिंहचा दावा आहे की हत्या केल्यानंतर अनेकांचे मृतदेह डेरा परिसरात गाडले जात होते. काही मृतदेह हे शेजारच्या नदीत सोडून दिले गेले होते. 
- खट्टासिंह यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, या सर्व घटनांची माहिती हरियाणा पोलिसांना होती.  तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची ते साधी दखलही घेत नव्हते. उलट त्यांनाच धाक दपटशहा दाखवून पिटाळून लावायचे. 
 
मर्डरच्या आधी चिता रचली होती 
- खट्टासिंहने दैनिक भास्करसोबत केल्या बातचीतमध्ये सांगितले, की गोरासिंहच्या हत्येआधी त्याची चिती रचली गेली होती. त्यानंतर त्याला चितेजवळ बोलावून तिथे त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर त्याचे शरीर चितेवर टाकून पेटवून देण्यात आले. जेव्हा काही लोकांनी, मुलगा जळत आहे आशी आरडाओरड केली, तेव्हा त्यावर पाणी टाकण्याऐवजी राम रहिमच्या लोकांनी चितेच्या आसपास पाणी टाकण्याचे नाटक केले. 
- खट्टासिंहने सांगितले, की जेव्हा गोरासिंहच्या भावाला हे सर्व माहित झाले तेव्हा त्याला आधी धमकावण्यात आले, नंतर महागडी गाडी देऊन त्याला विकत घेतले गेले. 
- आश्रमात फकिरचंद नावाच्या व्यक्तीचाही खून करण्यात आला होता. आश्रमाच्या परिसराची तपासणी केली गेली तर अनेक सांगाडे सापडतील.  
बातम्या आणखी आहेत...