आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण महिन्यात Non Veg ऐवजी लोक खातात खुखडी; मिळते 800 रुपये किलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात बहुतांश लोकांना चिकन आणि मटन खाण्याचा मोह सोडतात. झारखंडमध्ये श्रावण महिन्यात 'खुखडी'ची आवक वाढते. लोक नॉनव्हेजऐवजी खुखडीला अधिक पसंत करतात. सुदूर भागात उगवत असलेल्या 'खुखडी'ला (एक प्रकारचे मशरूम) श्रावणात मोठी मागणी असते. लोक नॉनव्हेजऐवजी खुखडी खाणे अधिक पसंती करत आहेत. सध्या रांची येथील बाजारात खुखडी 700 ते 800 रुपये प्रति किलोप्रमाणे विकली जात आहे.

काय आहे खुखडी?
खुखडी हुबेहूब मशरूम सारखी दिसते. खुखडीच्या अनेक जाती आहेत. परंतु, पुटो व सोरवा खुखडी जास्त प्रचालित आहे. भाजी तसेच औषधी म्हणूनही खुखडीचा वापर केला जातो.
दुर्मिळ आहे खुखडी

खुखडी फार दुर्मिळ आहे. पावसाळ्यात आकाशात चमकणारी वीज जमिनीवर कोसळते. जमिनीला भेगा पडतात. जमिनीतून पांढर्‍या रंगाची खुखडी बाहेर येते. दानेदार खुखडीला पुटो आणि लांबोळ्या आकारातील खुखडीला सोरवा असे म्हटले जाते.

गुराख्यांना असते चांगल्या 'खुखडी'ची पारख...
गुरे चारणार्‍या गुराख्यांना खुखडीची चांगली पारख असते. खुखडी कोणत्या कुठे उगवते, हे देखील त्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक असते. त्याचबरोबर आदिवासी लोकांना देखील खुखडीविषयी माहिती असते. आदिवासी महिला जंगलातून खुखडी तोडून आणतात आणि बाजारात विकतात.

रस्त्याच्या शेजारी भरतो बाजार...
सद्या रांची येथील बाजारात खुखडी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आदिवासी महिला रस्त्याच्या बाजुला टोपले घेऊ खुखडी विकताना दिसत आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...