आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्वालियर- येथील 4 महिण्याचा बाळाला दोन दिवसांपासुन ताप येत होता. त्याचे पालक उपचारासाठी दवाखण्यात घेऊन गेल्यानंतर तेथील कंपाउंडरने डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्या बाळाला इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच बाळाला त्रास सूरू झाला. वडिलांनी आरडा ओरड केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पंपाने ऑक्सीजन द्यायला सुरवात केली. पण शेवटी तडफडून त्या चिमुकल्याने आपल्या पालकांसमोरच जीव सोडला. ही बातमी कळताच चिमुकल्याच्या आईला धक्का बसला आणि ती बराचवेळ या धक्क्यातून सावरू शकली नाही.
हे आहे पुर्ण प्रकरण
- नवग्रह कॉलनीत राहणारे ध्यानेंद्र सिंह यांचा 4 महिण्यांचा मुलगा आयुष दोन दिवसांपासून आजारी होता. त्यांनी येथील रॉक्सी पुलाजवळील मुस्कान हॉस्पिटल मध्ये अयुषचा उपचार केला.
- शनिवारी सकाळी परत पालक मुलाला उपचारासाठी डॉ. जैन यांच्याकडे घेवून आले. डॉक्टरांच्या सांगण्यावर कंपाउंडर हेमंत कुशवाह यांने आयुषला एक इंजेक्शन दिले.
- इंजेक्शन देताच आयुष तडफडायला लागला आणि नंतर मरनावस्थेत पोहोचला. हे पाहताच ध्यानेंद्र सिंह यांनी डॉ. जैन यांना लवकर इलाज करायला सांगितले. डॉ. जैन हे आयुषच्या वडिलांना म्हणाले की, मुलगा ठीक होऊन जाईल.
- डॉ. जैन यांनी मुलाला पहिलेतर कंपाउंडरला पंपाने ऑक्सिजन द्यायला सांगितले. तब्बेतीत काही सुधारना होत नसल्याचे पाहून डॉ. जैन स्वत पंपाने ऑक्सिजन द्यायला लागले तरीही आयुषच्या तब्बेतीत काही सुधारना दिसून आली नाही.
वडिलांसमोर मुलाने घेतला अखेरचा श्वास
- आयुषची परिस्थिती पाहून त्याचे वडील ध्यानेंद्र बेडवरच जोरजोरात रडायला लागले. आयुषच्या ताईने त्याच्या तळपायाची मसाज पण केली. अखेर शेवटी आयुषचा मृत्यू झाला.
- आयुषचा मृत्यू होताच त्याचे पालक जोरजोरात रडायला लागले. या दरम्यान हॉस्पिटलच्या स्टॉपने तेथून काढता पाय घेतला. आयुषच्या मृत्युनंतर तीथे गर्दी जमली डॉक्टरांनी इलाजामध्ये हलगर्जी केल्याचा आरोप लावायला लागली.
- ही बातमी ऐकून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी एक्सपायरी डेटचे इंजेक्शन दिल्यामुळे आयुषचा मृत्यू झाल्याचा आरोप आयुषच्या वडिलांनी केला.
प्रशासनाने सुरू केला तपास
- यासोबत हॉस्पिटलमध्ये आपातकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन नाही. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडरही नाही. यानंतर सीएमएचओ डॉ. एस.एस. जादौन पण तेथे पाहोचले.
- आयुषचे वडील ध्यानेंद्रच्या तक्रारीवरून मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवले असून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या प्रकरणातील आनखी फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.