आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत ब्रिटिश जोडप्याची सुटका; टोळीकडून गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- अपहृत ब्रिटिश जोडप्याची सुटका करण्यात आली असून या गुन्ह्यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये र्शीलंकेच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. अपहरणानंतर आरोपींनी त्यांच्याकडून 2.58 कोटींची खंडणी मागितली होती.

चेन्नई पोलिस आणि ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तामिळनाडूच्या कुद्दलोर जिल्ह्यातील मंदरकुप्पम शहरातून रविवारी रात्री ब्रिटिश जोडप्याची सुटका करण्यात आली. ब्रिटन आणि भारतातील दोन शहरातून दोन टोळ्यांनी अपहरण केले होते. अशा पद्धतीच्या गुन्ह्याची ही पहिलीच घटना असल्याचे चेन्नईचे पोलिस आयुक्त एस. जॉर्ज यांनी सांगितले. ब्रिटिश नागरिक थावराजा (59) आणि त्याची पत्नी सलजा (55) 29 मे रोजी कोलंबोहून येथे आगमन झाल्यानंतर बेपत्ता झाले होते. दोघे श्रीलंका वंशाचे असून त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. दोघे जण तिरुचिरापल्लीहून टूर ऑपरेटमार्फत नऊ दिवसांच्या सहलीवर जाणार होते.

थावराजा आणि सलजा यांच्या लंडन येथील धश्रीनी मुलीस अज्ञात व्यक्तींनी दूरध्वनी करून दोघांचे अपहरण केल्याची माहिती दिली, तसेच आई-वडिलांच्या सुटकेसाठी 2.58 कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैशाची जमावजमव करण्याच्या नावाखाली मुलीने आरोपींकडून वेळ मागितला आणि त्यांच्यातील संभाषण पोलिसांना उपलब्ध करून दिले. अपहरणकर्त्याचे कुठलेही संकेत हाती नसताना क्लिपिंगच्या साहाय्याने त्यांचा माग काढल्याचे जॉर्ज म्हणाले.