आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत डॉक्टर दांपत्य यूपीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ / पाटणा - उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने बिहारमधील अपहृत डॉ. पंकज गुप्ता आणि पत्नी शुभ्रा यांना लखनऊमध्ये शोधून काढले. याबरोबर त्यांनी नऊ अपहरणकर्त्यांनाही अटक केली आहे. त्यांनी पंकज आणि शुभ्रा यांना गोमतीनगरच्या फ्लॅटमध्ये ओलीस ठेवले होते.

डॉ. पंकज आणि शुभ्रा यांचे १ मे रोजी गयेच्या बारापट्टी भागातून अपहरण झाले होते. झारखंडच्या गिरिडीहमधील एक लग्न समारंभ आटोपून ते घरी परतत होते. अपहरणकर्त्यांनी दोघांच्या सुटकेसाठी १५ कोटी रुपये खंडणी मागितली होती. उत्तर प्रदेशचे डीजीजी अरविंद कुमार जैन यांनी सांगितले की, बिहार पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला .