आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर जाहिरात देऊन सुरु आहे किडनीची खरेदी-विक्री, पोलिस अनभिज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल वर्तूळात किडनी विक्रेता संदीपचे विधान - Divya Marathi
लाल वर्तूळात किडनी विक्रेता संदीपचे विधान
जयपूर - इंटरनेटवर किडनी खेरदी-विक्रीचा धंदा बिनदिक्कत सुरु आहे. सात लाखांपासून 15 लाखांपर्यंत किंमत लावली जात आहे. त्यासाठी एक वेबसाइटच सुरु झाली असून त्यावर जाहिरात देऊन ग्राहकांचा शोध घेतला जातो आणि अव्वाच्यासव्वा दराने किंमत वसूल केली जाते. bartsblackboard.com या नावाने सुरु करण्यात आलेल्या वेबसाइटवर किडनी खरेदी-विक्रीचा धंदा सुरु आहे. येथे अनेक भारतीय आणि परदेशी यूजर किडनीचा व्यवहार करत आहेत.
dainikbhaskar.com ने या साइटवरील एका जाहिरातीची पडताळणी करण्यासाठी गरजू व्यक्ती म्हणून जाहिरातीत नमूद क्रमांकावर फोन केला आणि किडनीची गरज असल्याचे सांगितले. फोनवर झालेल्या वार्तालापात दहा लाखांमध्ये किडनी देण्याचे मान्य करण्यात आले. (फोनवर झालेली बातचीत एेका शेवटच्या स्लाइडवर.)
ब्लड ग्रूपपासून पत्त्यापंर्यंत माहिती
साइटवर पोस्ट करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये रक्त गटांपासून, मोबाइल क्रमांक, इमेल अशी सर्व माहिती उपलब्ध आहे. एका पोस्ट वरील मोबाइल क्रमांकावर फोन केल्यानंतर स्वतःचे नाव संदीप कुमार असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने दहा लाखात किडनी देण्याचे मान्य केले. कमीत कमी लाख-दिड लाख कमी करेल असेही त्याने सांगितले. संदीपने तो हरियाणातील हिसारचा राहाणार असल्याचे सांगितले. गरज पडली तर जयपूरला येण्याची तयारी असल्याचेही त्यांने मान्य केले. तो हरियाणामध्ये असल्याचे सांगत असला तरी त्याचा मोबाइल क्रमांक राजस्थान रिजनचा आहे. किडनीची खरेदी-विक्री करणाऱ्या bartsblackboard.com या वेबसाइटवर असे अनेक क्रमांक आहेत जे लोक कमीत कमी 10 लाखांमध्ये किडनी विक्री करण्यास तयार आहेत.
नियम काय सांगतो?
जयपूरचे ज्येष्ठ डॉक्टर अलोक जैन यांनी सांगितले, की मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नूसार किडनी खरेदी आणि विक्री दोन्ही अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्यानुसार फक्त रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच किडनी दान करु शकते.
किडनीची गरज असलेल्या रुग्नाला आई-वडील, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी किंवा पती किंवा पत्नी दान करु शकते. 2011 मध्ये या कायद्यात संशोधन करण्यात आले त्यानूसार आता आजी-अजोबा, नात-नातू देखील किडनी दान करु शकतात.
जयपूरचे पोलिस आयुक्त जंगा श्रीनिवासन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप याबद्दलची माहिती नसल्याचे म्हटले आहे. पोलिस याचा तपास करतील असे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर, किडनी विक्रेत्यासोबतच्या वार्तालापचा काही भाग