आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना कारमध्ये कोंडून शॉपिंग महागात पडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामगड - मुलांना बोलेरो गाडीत ठेवून शॉपिंगला जाणे एका कुटुंबाला महागात पडले. बराच काळ कोंडून राहिल्याने श्वास गुदमरून अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. राजस्थानात अलवार जिल्ह्यात रामगड शहरात पिपरोली येथील इश्ताक खान हे बहिणीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी कुटुंबासमवेत बाजारात आले होते. बाहेर ऊन असल्यामुळे तीन मुलांना कारमध्येच ठेवून ते खरेदीसाठी गेले. बराच वेळ मुले कारमध्ये बंद राहिली. काही वेळाने मुले उकाड्याने अस्वस्थ झाली. त्यांनी काचांवर हात-पाय मारले, जोराने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण कुणाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. श्वास गुदमरल्याने अडीच वर्षांच्या महिमाचा गाडीत मृत्यू झाला. साडेतीन वर्षांची परवाना व पाच वर्षांचा फरहान यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.