आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiku Gets Bail And Baba Gurmeet Ram Rahim Says He Forgives Him

\'कॉमेडी नाइट्स विथ कपिल\'मधील किकूला राम रहिम यांनी केले माफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किकू शारदाला अटक केल्यानंतरचे दृष्य - Divya Marathi
किकू शारदाला अटक केल्यानंतरचे दृष्य
कैथल (हरियाणा)- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमधील प्रमुख पात्र 'पलक'ची भूमिका साकारणा-या किकू शारदाला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या 'एमएसजी 2'च्या एका सीनवर कॉमेडी अॅक्ट सादर केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर किकू शारदाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. डेरा प्रमुखांनेही ट्विट करुन कीकूने माफी मागितल्यानंतर त्याला माफ केले आहे.

डेरा प्रमुखाने केलेल्या ट्विटमध्ये काय
ट्विटमध्ये म्हटले आहे, 'मी ऑनलाइन गुरुकुलच्या शुटिंगमध्ये व्यस्त होतो. मला या प्रकरणाबाबत माहिती नव्हती, आताच याबद्दल समजले. मात्र किकूने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे तर माझी त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.'
कोणत्या सीनवर घेतला आक्षेप...
- डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांचा आरोप आहे की जश्न-ए-आझादीच्या कॉमेडी शोमध्ये 'एमएसजी-टू' च्या एका सीनचे विद्रूपीकरण करण्यात आले.
- त्यात गुरमीत रामरहीम यांच्या गेटअपमध्ये कलाकार दारूचा प्याला भरतात आणि तरुणींसोबत अश्लील डान्स करतात.
- हा एपिसोड 27 डिसेंबरला टेलिकास्ट करण्यात आला होता.

कोणावर गुन्हा दाखल
- कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी), राजीव ठाकूर, पुजा बॅनर्जी, मुन्ना राय, गौतम गुलाटी आणि सना खानसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 'कॉमेडी नाइट विथ कपील'मध्ये कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी) च्या भूमिकेत असतो.
- यामध्ये किकू शारदाला कॅथल पोलिसांनी अटक वॉरंटवर ताब्यात घेतले आहे.
- किकूला पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबईहून कॅथलला घेऊन गेले. येथे त्याची चौकशी केली जात आहे.
- चौकशीपूर्वी किकूने माध्यमांना सांगितले, 'आम्ही कलाकार आहोत. आमचे काम हसवणे आहे. आमचा हेतू कुणाच्या धार्मिक भावना दुखावणे नाहीये. जर कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर हात जोडून माफी मागतो.'

कोण आहे तक्रारदार
- डेरा समर्थक उदयसिंह यांनी शुक्रवारी रात्री या कलाकारांविरुद्ध कैथल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
पुढील स्लाइडमध्ये, गुरमीत राम रहिम यांचे ट्विट