आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबत रंगेहाथ पकडले प्रियकराला, खुनानंतर साडी घालून झाला होता फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य आरोपी सादिक साडी घालून पळाला होता. - Divya Marathi
मुख्य आरोपी सादिक साडी घालून पळाला होता.
इंदूर - पत्नीला तिच्या प्रियकराच्या आक्षेपार्ह अवस्थेत पतीने रंगेहाथ पकडले आणि मग प्रियकराला समजावूनही प्रकरण न मिटल्याने चिडलेल्या पतीने चक्क त्याच्या खुनाचा कट रचला आणि तो साथीदारांसह अमलात आणला. एका महिन्यापूर्वी झालेल्या या हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला सोमवारी पोलिसांनी अटक केली. पकडल्यावर तो म्हणाला, खुनानंतर माझ्या कपड्यांवर रक्त लागले होते म्हणून मी साडी घालून फरार झालो.
 
असे आहे प्रकरण
अयोध्यापुरी कॉलनी लिंक रोडवर एका महिन्यापूर्वी तरुणाच्या हत्येत फरार असलेल्या मुख्य आरोपीला एमआयजी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर तो आजोबा-आजीच्या घरी राहत होता. पोलिसांनी घेराबंदी करून त्याला तेथून अटक केली. तरुणाच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना यापूर्वीच अटक झालेली आहे. आरोपीने सांगितले की, खुनानंतर त्याच्या कपड्यांवर रक्त लागले होते, यामुळे तो साडी घालून पळाला.
 
काय म्हणतात पोलिस?
एएसपी मनोज कुमार राय म्हणाले, 13 सप्टेंबरच्या दुपारी 1 वाजता कृष्णबाग कॉलनीतील रहिवासी मजीद (32) चा धारदार चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. 
- खुनानंतर पोलिसांनी इस्लामुद्दीन, सलमान, इमरोज यांना अटक केली होती.
- मजीदचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न इमरोजशी झाले होते. इमरोजने पत्नीला मजीदच्या घरी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. मजीदला समजही दिली होती, परंतु तो ऐकला नाही. इमरोजने त्याचे नातेवाईक इस्लामुद्दीनला तयार केले आणि मजीदच्या खुनाची 5 लाखांची सुपारी सलमानला दिली. 
- सलमानने त्याचा साथीदार सादिक (23) सोबत मिळून मजिदला मारण्याची तयारी केली. रेकीनंतर सादिकने चाकूंनी भोसकून मजीदचा खून केला होता. पोलिसांनी इस्लामुद्दीन, इमरोज आणि सलमानला अटक केली होती. सोमवारी सादिकला अटक झाली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...