आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ले. फैयाज यांचा मारेकरी अतिरेकी चकमकीत ठार, काश्मिरात अाणखी एक अतिरेकी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
श्रीनगर- दक्षिण काश्मिरातील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षकांनी चकमकीत एका अतिरेक्याचा खात्मा केला. दुसरीकडे, शुक्रवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी इश्फाक अहमद पड्डेरला चकमकीत ठार करण्यात आले. हा अतिरेकी लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या हत्येतही सहभागी होता. त्याला पकडण्यासाठी ६२ वी राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीने संयुक्त माेहीम राबवली. 

१० मे रोजी शोपियानच्या हरमनमध्ये शहीद ले. फैयाज यांचा मृतदेह आढळला होता. ते आपल्या नातलगाच्या लग्नासाठी गेले होते. तेथेच अतिरेक्यांनी त्यांना ठार केले. 

स्थानिकांनी सांगितले की, तोंडाला फडके बांधलेल्या दोन जणांनी त्यांना अापल्यासोबत चालण्यास सांगितले होते. फैयाज यांच्यावर जवळून डोके पोट आणि छातीत गोळ्या मारण्यात आल्या. गोळ्या झाडण्यापूर्वी फैयाज यांनी अतिरेक्यांना प्रतिकारही केला होता. या घटनेनंतर स्थानिकांत मोठा राग होता. लष्कराने हा प्रकार अत्यंत भ्याडपणाचा असल्याचे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...