आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Killing Me In Prison, Install Camera Yasin Bhatkal

तुरुंगात माझी हत्या होईल, कॅमेरे लावा - भटकळची कोर्टात याचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळने आपल्या जिवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला २४ तास कॅमे-याच्या देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असेही त्याने म्हटले आहे.

हैदराबादच्या तुरुंगात स्वच्छ पाणी, मोकळी हवा अाणि ऊन मिळत नाही. एनआयएच्या विशेष न्यायालयात दाखल याचिकेत भटकळने हे गाऱ्हाणे मांडले आहे. हैदराबादच्या दिलसुखनगरात फेब्रुवारी २०१३मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटप्रकरणी भटकळ आरोपी आहे. यात १८ जण ठार, तर १३१ जण जखमी झाले होते. संपूर्ण जेलच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या कोठडीत मात्र कॅमेरे लावलेले नाहीत. याच ठिकाणी आपल्याला ठेवण्यात आले आहे, असे भटकळचे म्हणणे आहे. काल्पनिक कहाण्या रचता याव्यात यासाठी तुरुंगाच्या अिधका-यांनी जाणीवपूर्वक हे केले असल्याचा त्याचा दावा आहे.

आयएस कनेक्शन : भटकळने पत्नीला फोन करून दमास्कसच्या मित्रांच्या मदतीने बाहेर येईन, असे सांगितले होते. गेल्या आठवड्यात त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे भटकळच्या भीतीमागे हे कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जबीच्या जिवाला धोका,
एनआयएची माहिती

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली न्यायालयात सांगितले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच तशी शक्यता वर्तवली असल्याने त्याला आर्थर रोड तुरुंगातून वारंवार न्यायालयात हजर करता येणार नाही, असे एनआयएने म्हटले आहे.