आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शापित आहे हे राजघराणे, 400 वर्षांत राजा-राणीला नाही झाली पूत्रप्राप्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूरचे महाराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांचा सोमवारी डूंगरपूरची राजकुमारी तृषिकासोबत विवाह झाला. - Divya Marathi
म्हैसूरचे महाराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांचा सोमवारी डूंगरपूरची राजकुमारी तृषिकासोबत विवाह झाला.
बंगळुरु - म्हैसूरचे महाराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांचा सोमवारी राजस्थानमधील डूंगरपूरची राजकुमारी तृषिकासोबत विवाह झाला. मंगळवारी त्यांचे ग्रँड रिसेप्शन झाले. पाच दिवस चाललेल्या या शाही विवाह सोहळ्याला देश-विदेशातील अनेक पाहुणे आले होते. 40 वर्षांनंतर राजघराण्यात शहनाईचे सूर घुमले होते. याआधी अंबा विलास पॅलेसमध्ये दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंह राजे वाडियार यांचा 1976 मध्ये प्रमोदा देवीसोबत विवाह झाला होता.

दत्तक राजपूत्र आहे यदुवीर
दिवंगत महाराज श्रीकांतदत्त आणि राजमाता प्रमोदादेवी यांना मुलबाळ झाले नाही. त्यामुळे प्रमोदादेवी यांनी त्यांच्या नणंदेच्या मुलाला - यदुवीरला दत्तक घेतले आणि गेल्या वर्षी त्याला वाडियार राजघराण्याचा वारस केले.

400 वर्षांत नाही झाला मुलगा
ही काही पहिली वेळ नव्हती की वाडियार राजघराण्यात दत्तक पुत्राला राजा करण्यात आले. गेल्या 400 वर्षांमध्ये राजघराण्यातील राजा-राणीला मुलगा झालेला नाही. म्हणजेच राजघराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी 400 वर्षांपासून राजपरिवार दुसऱ्या कुणाचा पूत्र दत्तक घेत आला आहे.
कोणी दिला होता शाप
> राजघराण्याबद्दल असे म्हटले जाते की 1612 मध्ये दक्षिणेतील सर्वात शक्तीशाली विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर वाडियार राजांच्या आदेशाने विजयनगरची सर्व धन-संपत्ती लूटली गेली होती.
> तेव्हा विजयनगरची तत्कालिन राणी अलमेलम्मा पराभवानंतर एकांतवासात गेली होती. मात्र तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे-मोती होते.
> वाडियार राजाने महाराणीकडे दूत पाठवून कळविले की आता तिच्याकडे असलेली संपत्ती ही वाडियार साम्राज्याची शाही संपत्ती आहे, त्यामुळे तिने ती वाडियार राज्याच्या खजिन्यात जमा करावी.
> अलमेलम्माने दागिने देण्यास नकार दिला. तेव्हा शाही फौजांनी बळजबरीने तिच्या खजिना लूटण्याचा प्रयत्न केला.
> यामुळे नाराज झालेल्या अलमेलम्माने कथितरित्या वाडियार राजाला शाप दिला, की तु माझे घर उद्धवस्त केले. तसेच तुझे राज्य उद्धवस्त होईल.
> वाडियार राजघराण्यातील राजा-राणीला संतती सूख मिळणार नाही. त्यानंतर अलमेलम्माने कावेरी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
> राजाला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. मात्र आता त्याच्या हातात काहीही उरले नव्हते. तेव्हापासून आतापर्यंत 400 वर्षांपासून वाडियार राजघराण्यात कोणत्याही राजाला पुत्रप्राप्ती झालेली नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> कसा आहे अंबा विलास पॅलेस..
>> यदुवीर आणि तृषिकाचा शाही विवाह

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...