आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्रासाठी भारतात आला होता हा राजा, 10 वर्षांनी लहान तरुणीवर जडला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक हे महाराणी जेटसन पेमा वांगचुक यांच्यासोबत चार दिवसीय भारत दौर्‍यावर आले आहेत. भूतानचे हे शाही कपल भारत दौर्‍यावर पहिल्यांदा आले नाहीत, याआधी ते विवाहानंतर मधुचंद्रासाठी राजस्थान आले होते. सध्या त्यांना एक मुलगा आहे.

17 वर्षाच्या पेमावर जडला होता जीव...
- जेटसम पेमा या जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या पेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान आहेत. दोघे भेटले तेव्हा वांगचुक हे भूतानचे राजकुमार होते.
- राजकुमार वांगचुक यांनी गुढघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाइलमध्ये पेमा यांना प्रपोज केले होते.
- सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पेमा यांचे आयुष्य या क्षणानंतर कायमचे बदलून गेले.
- वैमानिकाची कन्या असलेल्या पेमा यांनी लंडनमधील रेजेंट्स कॉलेजमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे.

सर्वाधिक काळ घालवला भारतात...
- पेमा यांनी 1999 मध्ये पश्चिम बंगालच्या कलिमपोंगमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अॅडमिशन घेतले होते.
- सन 2000 मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्या थिंपूमध्ये निघून गेल्या. 13 एप्रिल 2006 रोजी पुन्हा भारतात आल्या. हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेंस स्कूलमध्ये त्यांनी 11 वीत प्रवेश घेतला होता. 31 मार्च 2008 रोजी 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर त्या उच्चशिक्षणासाठी लंडनमध्ये गेल्या होत्या.

भारतातील या शहरात साजरा केला हनिमून...
- भूतानचे नरेश वांगचुक आणि महाराणी जेटसन पेमा वांगचुक यांचा विवाह 11 ऑक्टोबर 2011 रोजी झाला होता. नवदाम्पत्य 27 ऑक्टोबर 2011 मध्ये नऊ दिवसांसाठी भारत दौर्‍यावर आले होते. शाही कपल स्पेशल लक्झरी ट्रेनने राजस्थानला पोहोचले होते. जयपूर किल्ला आणि महालही पाहिला होता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... भूतानचे नरेश वांगचुक आणि महाराणी जेटसन पेमा वांगचुक यांचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...